जगातील सर्वात शक्तीशाली ब्रिटीश सत्ता काँग्रेसमुक्त भारत करु शकली नाही, नरेंद्र मोदी काय करणार?

Rahul Gandhi : इंडिया आघाडीची (INDIA Alliance) दोन दिवसीय बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीसाठी काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) मुंबईत आले होते. बैठक संपल्यानंतर राहुल गांधी यांनी मुंबईतल्या काँग्रेस पक्षाचं मुख्यालय टिळक भवन (Tilak Bhavan) इथं भेट देऊन कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी राहुल गांधी यांनी मोदी सरकार आणि भाजपवर (BJP) जोरदार हल्लाबोल केला.

Sep 01, 2023, 21:19 PM IST
1/7

अदानीच्या पैशाने काँग्रेसला हरवण्याचे स्वप्न नरेंद्र मोदी पहात आहेत. काँग्रेसमुक्त भारत करण्याचे स्वप्न ते पहात आहेत पण जगात एकवेळ सर्वात शक्तीशाली ब्रिटीश सत्ता होती, ती ब्रिटिश सत्ता काँग्रेसला संपवू शकली नाही, काँग्रेस पक्षानेच सर्वशक्तीमान ब्रिटीशांना देशातून पळवून लावले तिथे नरेंद्र मोदी काय काँग्रेसमुक्त भारत करणार? असा हल्लाबोल काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी भाजपावर केला. 

2/7

काँग्रेस पक्षाचे मुख्यालय टिळक भवन इथं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने राहुल गांधी यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राहुलजी गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल केला. जगातील दोन मोठ्या वर्तमानपत्रांनी अदानींच्या भ्रष्टाचाराची पोलखोल केली आहे. भारतातून 1 बिलीयन डॉलर परदेशात गेले आणि तो पैसा पुन्हा भारतात गुंतवून अदानीने भरपूर संपत्ती कमावली.

3/7

या संपत्तीतूनच अदानीने देशातील विमानतळ, रेल्वे, खाणी, वीज, बँका विमा कंपन्या विकत घेतल्या. आता अदानी धारावीला संपवण्याचे काम करत आहेत पण त्यांना धारावी समजलेली नाही. काँग्रेस पक्ष धारावी संपवू देणार नाही. गरिबांचा हिंदुस्थान संपवण्याचं मोदींचं स्वप्न काँग्रेस पूर्ण होऊ देणार नाही. 

4/7

काँग्रेस पक्षात दम नाही असं म्हणतात मग कर्नाटकात भाजपाचा सफाया कोणी केला? महाराष्ट्रातूही भाजपाचा पराभव होणार आहे, तेलंगणा, छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेशमधूनही भाजपा पराभव होणार असून त्यानंतर लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षच भाजपला पराभूत करून विजयी होणार आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. 

5/7

मोदी सरकारने कितीही यंत्रणा कामाला लावू दे, काहीही करु देत काँग्रेस पक्षाला कोणीही रोखू शकत नाही. महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष मजबूत आहे कारण काँग्रेस पक्ष विचारधारेचा पक्ष आहे, काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता कोणालाही घाबरत नाही, असं राहुल गांधी यांनी म्हटलं. 

6/7

मोदी आणि त्यांच्या लोकांनी कटकारस्थान करून राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली. राहुल गांधी सातत्याने गरिबांचा आवाज उठवत होते, बेरोजगारीवर आवाज उठवत होते, मोदींविरुद्ध आवाज उठवत होते म्हणून त्यांचा आवाज बंद करण्यासाठी खासदारकी रद्द करण्यात आली पण राहुल गांधी यांची खासदारकी बहाल करावी लागली.मोदी दिल्लीहून कर्नाटकात येऊन गल्लीबोळात फिरले पण कर्नाटकची जनता भुलथापांना कोणी बळी पडली नाही, असा निशाणा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. 

7/7

आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष विजयी होऊन विधाभवनवर काँग्रेसचाच तिरंगा फडकेल असा विश्वास काँग्रेल प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला. मराठा समाजाली मीच आरक्षण देतो म्हणणाऱ्या फडणवीसांनी आरक्षण नाही तर पोलीसांकरवी लाठ्या काठ्यांनी मारलं अशी टीकाही नाना पटोले यांनी केली.