Sara Ali Khan Net Worth: कधीकाळी स्थूलतेनं त्रस्त असणाऱ्या 'या' अभिनेत्रीकडे 41 कोटींची संपत्ती; ड्रग्स केसमध्ये नाव; रणवीर सिंगवर होती फिदा
Sara Ali Khan Birthday: आपण ज्या स्टारकिडबद्दल बोलत आहोत ती एक उगवती बॉलिवूड अभिनेत्री असून तिचा संबंध बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट कुटुंबाशी आहे. तिच्या धार्मिक श्रद्धेमुळे तिला अनेक वेळा ट्रोल करण्यात आलं. पण ती तिच्या आदर्शांवर ठाम राहिली आणि तिच्या विश्वासामुळे तिने कधीही तिच्या विरोधकांची माफी मागितली नाही. आज या अभिनेत्रीचा वाढदिवस असून ती 29 वर्षांची झालीय.
नेहा चौधरी
| Aug 12, 2024, 18:54 PM IST
1/8
2/8
आम्ही कोणाबद्दल बोलत आहोत, तुमच्या लक्षात आलं असेलच. हो, आम्ही बोलत आहोत, सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खान जिचा आज वाढदिवस आहे. तर करिना कपूर तिची सावत्र आई आहे. ती जेव्हा जेव्हा मंदिरांना भेट द्यायची ते फोटो ती सोशल मीडियावर शेअर करायची. त्यानंतर तिच्यावर एका वर्गातून खूप टीका झाली. पण तिने याकडे लक्ष न देतात आपली भक्ती कायम ठेवली.
3/8
सारा अली खानने 2018 च्या 'केदारनाथ' चित्रपटाद्वारे पदार्पण केलं, पण अभिनयाची तिची आवड तिच्या शालेय दिवसांमध्ये लागली होती. ती शाळेत असताना नाटकांमध्ये उत्साहाने भाग घ्यायची. पण 96 वजन असल्याने तिला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला. अखेर तिने फॅट टू फिटचा प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला आणि तिने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला.
4/8
सारा अली खानने न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठातून इतिहास आणि राज्यशास्त्राचा अभ्यास पदवी प्राप्त केलीय. तिचा शालेय जीवनातील एक मजेदार किस्सा आहे. सारा अली खानला एकदा शाळेतून निलंबित केलं होतं. कारण अभिनेत्रीने तिच्या एका चाहत्यावर फेविकॉलने भरलेली बाटली फेकली होती, त्यामुळे फेविकॉल सगळीकडे पसरलं होतं.
5/8
6/8
7/8