Malaika Arora Photos : केसांचा अंबाडा, डोळ्यावर काळा चष्मा; मलायका अरोराचा एअरपोर्टवरचा ट्रेडिशनल लूक चर्चेत

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री मलायका अरोराचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये अभिनेत्री पारंपारिक लूकमध्ये दिसली आहे.

Soneshwar Patil | Sep 08, 2024, 19:12 PM IST
1/6

नेहमी चर्चेत

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा जरी चित्रपटांमध्ये दिसत नसली तरी ती दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेत असते.

2/6

मुंबई विमानतळ

नुकतीच अभिनेत्री मुंबई विमानतळावर स्पॉट झाली. ज्यामध्ये मलायका अरोरा अतिशय सुंदर लूकमध्ये दिसली होती.

3/6

पांढऱ्या रंगाचा सूट

मलायकाचा विमानतळावर सिंपल लूक पाहायला मिळाला. या फोटोमध्ये अभिनेत्रीने पांढऱ्या रंगाचा सूट परिधान केला होता.

4/6

खास लूक

यावेळी मलायकाने अतिशय हलका मेकअप, केसांचा अंबाडा आणि डोळ्यांवर काळा चष्मा घालून तिने हा लूक पूर्ण केला आहे.

5/6

चाहत्यांकडून कौतुक

मलायका अरोराचा हा सिंपल लूक पाहून तिचे चाहते देखील घायाळ झाले आहेत. चाहत्यांनी तिच्या या लुकचे कौतुक केलं आहे.

6/6

ब्रेकअपमुळे चर्चेत

अभिनेत्री गेल्या काही दिवसांपासून तिच्या ब्रेकअपमुळे चर्चेत आहे. मात्र, अद्याप मलायका अरोराने किंवा अर्जुन कपूरने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.