10 कोटी सूर्य सामावतील एवढा मोठा ब्लॅकहोल सापडला, भारतीय खगोलशास्त्रज्ञाची कमाल!

'जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप'ने  शोधलेल्या ब्लॅकहोलचे फोटो नासाने सोशल मिडियावर शेअर केले आहेत.   

Nov 07, 2023, 18:35 PM IST

 Black Hole UHZ1 : अवकाश हे अनेक रहस्यांनी भरलेले आहे. यातीलच एक न उलगडलेले रहस्य म्हणजे ब्लॅकहोल. 10 कोटी सूर्य सामावतील एवढा मोठा ब्लॅकहोल संशोधकांना सापडला आहे. UHZ1 गॅलेक्सीमध्ये  हा ब्लॅकहोल दिसला.

1/7

UHZ1  गॅलेक्सी आणि ब्लॅकहोल पृथ्वीपासून तब्बल 13.2 बिलियन प्रकाशवर्षं दूर आहे. 

2/7

ब्लॅकहोल आजही संशोधकांसाठी एक मोठ रहस्य आहे. येथे भौतिकशास्त्राचा कोणाताही नियम चालत नाही. आपल्या शक्तीशाली गुरुत्वाकर्षणाने ब्लॅकहोल सर्व काही स्वत:कडे खेचून घेते.

3/7

10 कोटी सूर्य सामावतील एवढा मोठा हा ब्लॅकहोल असल्याचा दावा केला जात आहे. 

4/7

बिग बँगनंतर ज्यावेळेस विश्वाची निर्मी होऊन 470 मिलियन वर्ष झाली होती तेव्हाची ही आकाशगंगा असल्याचं नासाचा दावा आहे.

5/7

 'जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप'ने  शोधलेलल्या 11 जुन्या गॅलेक्सींपैकी UHZ1 या गॅलेक्सीमध्ये हे ब्लॅकहोल सापडला आहे. 

6/7

चंद्र या एक्सरे ऑब्जर्वेटरीने गॅलेक्सीमधील ब्लॅकहोल शोधला आहे. ज्या टीमने हे संशोधन केले यात एका भारतीय खगोलशास्त्रज्ञाचा समावेश आहे.

7/7

नासाच्या 'जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप'ने या ब्लॅक होलच्या होस्ट गॅलेक्सीचा शोध लावला.