कॉमेडी, बोल्ड, सस्पेन्स आणि थ्रिलर, 'या' Marathi Webseries पाहायला विसरू नका!

Best Marathi Webseries to Watch: सध्या उन्हाळ्याचा सिझन सुरू झाला आहे. त्यामुळे मस्त सुट्टी एन्जॉय करण्याकडे सगळ्यांचे कल (Web Series to Watch in Marathi) असेलच तेव्हा या मे महिन्याच्या सुट्टीत तुम्ही तुमच्या आवडत्या मराठी वेबसिरिज पुन्हा एकदा पाहू शकता. तेव्हा या लेखातून जाणून घ्या या महिन्यात पाहण्यासाठी आत्तापर्यंतच्या बेस्ट मराठी वेबसिरिज! 

गायत्री हसबनीस | May 03, 2023, 19:03 PM IST

Best Marathi Webseries to Watch: हिंदी - इंग्रजी वेबसिरिजप्रमाणे आता मराठीमध्येही आगळ्यावेगळ्या आणि हटके वेबसिरिज (Popular Marathi Web Series) येत आहेत तेव्हा तुमच्यासाठीही यंदाच्या मे महिन्याच्या सुट्टीत या वेबसिरिज पाहण्याची चांगली संधी आली आहे. तेव्हा जाणून घ्या या मे महिन्याच्या (Popular Web Series Dubbed in Marathi) सुट्टीत तुम्ही कोणकोणत्या मराठी वेबसिरिज पाहू शकता. 

(Photos : You Tube)

1/8

high time

हाय टाईम - तरूणांची मजा मस्ती, त्यांच्या समस्या या 'हाय टाईम' या वेबसिरिजमधून तुम्ही पाहू शकता. 

2/8

anamika marathi dubbed

अनामिका (मराठी डब्ड) - 'अनामिका' ही सनी लिओनीची मुख्य भुमिका असलेली वेबसिरिज मराठीतूनही उपलब्ध आहे, तुम्ही ही 'एमएक्स प्लेअर'वर पाहू शकता. 

3/8

the liftman

द लिफ्टमन - भाऊ कदम यांची गाजलेली 'द लिफ्टमन' ही कॉमेडी वेबसिरिज तुम्ही 'झी 5' वर पाहू शकता. 

4/8

pandu

पांडू - 'भाडिपा'ची 'पांडू' ही वेबसिरिजही गाजली होती. तुम्ही ही वेबसिरिज 'एमएक्स प्लेअर'वर पाहू शकता. यातून तुम्हाला कॉमेडी आणि सामजिक विषय असा आशय पाहायला मिळेल. 

5/8

kale dhande

काळे धंदे - 'काळे धंदे' ही वेबसिरिज प्रचंड गाजली होती. ही एक ब्लॅक कॉमेडी आहे. 'झी 5' वर तुम्हीही ही वेबसिरिज पाहू शकता. 

6/8

ani kay hava

आणि काय हवं? - प्रिया बापट आणि उमेश कामत ही प्रत्येकाची आवडती जोडी आहे. कपल स्टोरी सगळ्यांनाच पाहायला आवडतात. तेव्हा साकेत आणि जूईची ही आगळीवेगळी लव्ह स्टोरी तुम्ही 'एसएक्स प्लेअर'वर पाहू शकता. 

7/8

gondya ala re

गोंद्या आला रे - भुषण प्रधान, सुनिल बर्वे, आनंद इंगळे अशा कलाकारांच्या अभिनयानं गाजलेली 'गोद्या आला रे' ही वेबसिरिज तुम्ही 'झी 5' वर पाहू शकता. 1897 साली ब्रिटिश अधिकारी रॅण्ड याची हत्या करण्यात यशस्वी ठरलेल्या चाफेकर बंधूंची ही कहाणी आहे. 

8/8

samantar

समांतर - स्वप्नील जोशी, सई ताम्हणकर आणि तेजस्विनी पंडित यांच्या दमदार अभिनयानं गाजलेली ही वेबसिरिज तुम्ही अवश्य पाहा. या सिरिजमध्ये मसाला आणि सेस्पेन्स भरलेला आहे. या मालिकेचे दोन सिझन्स 'एमएक्स प्लेअर'वर उपलब्ध आहेत.