1 तास 39 मिनिटांचा हा चित्रपट हादरवून सोडेल, प्रत्येक सीन पाहून तुम्ही चक्रवाल; उडेल रात्रीची झोप
या चित्रपटाची दृश्ये पाहताना तुम्ही डोळे बंद कराल आणि तुमच्या मनात एकच विचार येईल. हे खरंच घडू शकतं का? चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला गूजबंप्स येतील.
तेजश्री गायकवाड
| Feb 17, 2025, 13:52 PM IST
Best Horror Suspense Thriller Movie: या चित्रपटाची दृश्ये पाहताना तुम्ही डोळे बंद कराल आणि तुमच्या मनात एकच विचार येईल. हे खरंच घडू शकतं का? चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला गूजबंप्स येतील.
1/7

Best Horror Suspense Thriller Movie: तुम्ही अनेक हॉरर, थ्रिलर आणि सस्पेन्स चित्रपट पाहिले असतील, पण आज आम्ही ज्या सिनेमाबद्दल सांगणार आहोत तो असा चित्रपट आहे जो तुम्ही कधीच पाहिला नसेल. जर तुम्ही घाबरत असाल तर हा चित्रपट अजिबात पाहू नका. या चित्रपटातील प्रत्येक सीन पाहून तुमचा तुम्ही चक्रवाल. चित्रपटाचा क्लायमॅक्स पाहून तुमचे डोकं सुन्न होईल.
2/7

आज आम्ही तुम्हाला अशा एका जबरदस्त चित्रपटाबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला हॉरर, थ्रिलर आणि सस्पेन्स सगळंच बघायला मिळेल. हा चित्रपट 2008 मध्ये म्हणजेच 16 वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. त्याची कथा भितीदायक, भयानक आणि वेदनादायक दृश्यांनी भरलेली आहे. या चित्रपटाची दृश्ये पाहताना तुम्ही डोळे बंद कराल आणि तुमच्या मनात एकच विचार येईल. हे खरंच घडू शकतं का? चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला गूजबंप्स येतील.
3/7

या चित्रपटाची कथा लुसी आणि ॲना या दोन मुलींभोवती फिरते. या दोन्ही मुली लहानपणापासूनच बाल अत्याचाराच्या बळी ठरतात आणि नंतर बदला घेण्याचे ठरवतात. या चित्रपटातील प्रत्येक दृश्य तुम्हाला थक्क करतील. हा फ्रेंच-कॅनडियन हॉरर चित्रपट आहे. याचे दिग्दर्शन पास्कल ला गियर यांनी केले आहे. या चित्रपटालाही प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आणि तो प्रेक्षकांना हसवतोच पण कधी रडवतो तर कधी घाबरवतो.
4/7

या चित्रपटाचे नाव 'मार्टियर्स' असे आहे. हा एक सायकोलॉजिकल हॉरर चित्रपट आहे. सूडापासून ते धोकादायक हिंसाचारही या चित्रपटात पाहायला मिळतो. हे पाहिल्यानंतर तुम्हाला भीतीची खरी जाणीव होईल, कारण या चित्रपटाचा प्रत्येक सीन अशा पद्धतीने चित्रित करण्यात आला आहे की, जणू काही ते प्रत्यक्षात घडत असल्याचा भास प्रेक्षकांना होतो. चित्रपटात दाखवण्यात आलेला अत्याचार इतका भयानक आहे की, तो पाहिल्यानंतर तुमचा आत्मा थरथर कापेल आणि तुम्हाला रात्री झोप लागणार नाही.
5/7

6/7
