Baba Siddiqui : आतिशबाजी, चेहऱ्यावर रुमाल... बाबा सिद्दींकीसोबत शेवटच्या 10 मिनिटांत काय झालं? 9.15 ते 9.25 यामधली पूर्ण कहाणी

बाबा सिद्दीकी यांच्यावर शनिवारी रात्री 9.30 च्या सुमारास गोळीबार झाला. यामध्ये बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला. बाबा सिद्दीकी यांच्या निधनाच्या 10 मिनिटांपूर्वी नेमकं काय झालं?  

| Oct 13, 2024, 08:35 AM IST

बाबा सिद्दीकी यांच्यावर शनिवारी रात्री 9.30 च्या सुमारास गोळीबार झाला. यामध्ये बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला. बाबा सिद्दीकी यांच्या निधनाच्या 10 मिनिटांपूर्वी नेमकं काय झालं?  

1/14

बाबा सिद्दीकी अनेक वर्षे काँग्रेसमध्ये राहिले आणि महाराष्ट्रातील काँग्रेसचा मोठा चेहरा होता. 

2/14

काही महिन्यांपूर्वी काँग्रेसमधील गटबाजीमुळे बाबा सिद्दीकी यांनी पक्ष सोडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

3/14

 बाबा सिद्दीकी यांच्याकडे मुंबई विभागाचा कारभार होता. 

4/14

शनिवारी सायंकाळी दसऱ्याच्या दिवशी बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झीशान याच्या कार्यालयाबाहेर तीन राउंड गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.

5/14

तो बाबा सिद्दीकीला घाबरवण्यासाठी आला नसून खुनाच्या उद्देशाने आला होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे. 

6/14

त्यामुळे आरोपींनी बाबा सिद्दीकी यांच्या इतक्या जवळून गोळीबार केला की त्यांच्या जगण्याची शक्यताच उरली नाही. 

7/14

गोळीबाराची ही घटना वांद्रे पूर्व येथे घडली.

8/14

रात्री 9.15 च्या सुमारास बाबा सिद्दीकी त्यांचा मुलगा जीशानच्या कार्यालयासमोर उभे होते. 

9/14

एका कारमध्ये तीन जण आले आणि त्यांनी तोंड रुमालाने झाकले होते. तिघेही सिद्दिकीच्या जवळ आले आणि तीन राऊंड फायर करण्यात आले. 

10/14

 सिद्दीकीच्या छातीत गोळी लागल्याचे सांगण्यात येत आहे. 

11/14

हा गोळीबार झाला तेव्हा जवळच लोक फटाके फोडत होते.

12/14

दसऱ्याच्या निमित्ताने दुर्गा देवीची मिरवणूक निघाली होती. फटाकेही फोडले जात होते.

13/14

त्याचवेळी अनेकांना संशय येऊ नये म्हणून हल्लेखोरांनी गोळीबार केला. 

14/14

गोळीबारानंतर मारेकऱ्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र दोघांना पोलिसांनी पकडले. तर एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला.