EXCLUSIVE Photos : सुबक नक्षीकाम, मोठाले खांब आणि... पाहा कसा तयार होतोय रामलल्लांचा दरबार

Ayodhya Ram Mandir EXCLUSIVE Photos : कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम... पाहा लाडक्या रामलल्लांचा दरबार नेमका कसा आकार घेतोय   

Nov 01, 2023, 08:58 AM IST

Ayodhya Ram Mandir EXCLUSIVE Photos : अयोध्येमध्ये सध्या एकच चर्चा आहे ती म्हणजे प्रभू श्रीरामांच्या मंदिराची. चला तर मग पाहूया हे मंदिर नेमकं कसं आकार घेतंय.... 

 

1/9

बांधणीच्या कामाला आता बराच वेग

Ayodhya Ram Mandir exclusive photos

Ayodhya Ram Mandir EXCLUSIVE Photos : अयोध्येतील राम मंदिराच्या बांधणीच्या कामाला आता बराच वेग प्राप्त झाला आहे. मंदिराचं बहुतांश काम आता पूर्णही झाल्याचं पाहायला मिळत आहे. 

2/9

मंदिराचा गाभारा

Ayodhya Ram Mandir exclusive photos

रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना जिथं होणार आहे ते मंदिराचं गर्भगृहसुद्धा अतिशय कलात्मकरित्या तयार केलं जात आहे. 

3/9

रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना

Ayodhya Ram Mandir exclusive photos

22 जानेवारी 2024 रोजी निर्धारित तारखेनुसार या मंदिरात रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे. तत्पूर्वी मंदिरातील जमीन, विद्युतप्रवाह व्यवस्था या अशा महत्त्वाच्या गोष्टींची कामं पूर्ण केली जात आहेत.   

4/9

संगमरवरामध्ये या मंदिराची उभारणी

Ayodhya Ram Mandir exclusive photos

संगमरवरामध्ये या मंदिराची उभारणी होत असून, त्यावर सुबक असं नक्षीकामही करण्यात येत आहे.   

5/9

अनेक देवतांचं दर्शन

Ayodhya Ram Mandir exclusive photos

श्रीरामांच्या या मंदिरामध्ये ब्रह्मा , विष्णू आणि महेशाचंही दर्शन भाविकांना घेता येणार आहे. इथं निद्रावस्थेत असणारे विष्णू आणि नाभीतून अवतारित झालेले ब्रह्मा त्यांच्या शेजारी असणारे शंकर अशा देवतांचं दर्शन भाविकांना मिळणार आहे.   

6/9

सुरेख रोषणाई

Ayodhya Ram Mandir exclusive photos

फक्त त्रिदेवच नव्हे, तर राम मंदिराच्या या गाभाऱ्यामध्ये परमभक्त मारुतीरायालाही विशेष स्थान देण्यात आलं आहे. राम मंदिरामध्ये कलाकुसरीसोबतच नेत्रदीपक रोषणाईसुद्धा पाहायसा मिळणार आहे. 

7/9

सुरेख अशी कलाकृती

Ayodhya Ram Mandir exclusive photos

राम मंदिराच्या गाभाऱ्यात मकराना नावाच्या खडकावर सुरेख अशी कलाकृती साकारण्यात आली आहे. 

8/9

200 मीटर लांबीचा एक बोगदा

Ayodhya Ram Mandir exclusive photos

मंदिराच्या मुख्य दाराच्या खालून 200 मीटर लांबीचा एक बोगदा तयार करण्यात आला आहे. 

9/9

अंतिम झलक पाहण्यासाठीच सगळे उत्सुक

Ayodhya Ram Mandir exclusive photos

मंदिराच्या बहुतांश भागांचं बांधकाम सध्या पूर्ण झालं असून, आता फक्त मंदिराची अंतिम झलक पाहण्यासाठीच सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.