#AsianGames2023 : हरमनप्रीत-लवलीने Asian Games मध्ये केलं भारताचं नेतृत्व, पाहा Opening Ceremony चे फोटो

#AsianGames2023 : चीनमधील हांगझू मध्ये 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धा सुरु झाल्या आहे. भारतीय खेळांडूनी स्पर्धेची जोरदार सुरुवात केली आहे.   

| Sep 24, 2023, 08:31 AM IST

#AsianGames2023 : चीनमधील हांगझू मधील 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली आहे. यंदा  655 भारतीय खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात सहभाग घेतला आहे. 

1/7

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात पुरुष हॉकी टीमचा कर्णधार हरमनप्रीत सिंह आणि बॉक्सर लवलीना बोरगोहेन भारतीय संघाचं नेतृत्त्व केलं.

2/7

भारतीय खेळाडूंच्या ड्रेस कोडचा रंग खाकी होता. महिला खेळाडू खाकी साडीत, तर पुरुष खेळाडू खाकी कुर्त्यामध्ये दिसले. 

3/7

आशियाई क्रिडा स्पर्धेत पहिल्याच दिवशी भारताने खातं उघडलं आहे. भारताने दोन रौप्य पदकांची कमाई केली आहे. 

4/7

10 मीटर महिला एअर राफलमध्ये मेहुली घोष, आशी चौकसे आणि रमिता यांनी रौप्य पदक पटकावलं. 

5/7

तर पुरुषांच्या रोईंगमध्ये अरुण आणि अरविंद या जोडीने रौप्यपदकावर आपलं नाव कोरलं. 

6/7

विश्व चॅम्पियन नीरज चोप्रा, भारतीय पुरुष आणि महिला क्रिकेट संघ, हॉकी संघ बॉक्सर निखत जरीन आणि मीराबाई चानू यांच्याकडून पदकांची आशा आहे.

7/7

गेल्या वर्षी भारतीय खेळांडूंनी एकूण 70 पदकांची कमाई केली होती. यंदा या संख्येत भार पडण्यासाठी भारतीय खेळाडू मैदानात उतरले आहेत.