PHOTO : शाहरुखसोबत झळकलेल्या 'या' अभिनेत्याला नंतर कोणी पाहिलंच नाही; अचानक तो ऑस्करच्या शर्यतीत पोहोचला आणि अनेकांनाच बसला धक्का

Entertainment : शाहरुख आणि या चिमुकल्याने अभिनय क्षेत्रात एकाच मालिकेतून सुरुवात केली. अगदी चित्रपटातही त्याला काम मिळालं पण नंतर कोणी पाहिलंच नाही त्याला....

Feb 15, 2024, 11:47 AM IST
1/7

जेव्हा हा अभिनेता कुठे गेला हे सगळे विचार करत होते, तेव्हा त्यांनी दुसरं क्षेत्र निवडलं आणि त्यात त्याने डायरेक्ट सिक्सर मारला. अचानक तो ऑस्करच्या शर्यतीत पोहोचला आणि त्यांने सर्वांना आनंदाचा धक्का दिला. 

2/7

महाराष्ट्रातील कोल्हापूर शहरात जन्माला आलेला या चिमुकल्याच नाव आहे आशुतोष गोवारीकर. आज त्यांचा 60 वा वाढदिवस असून त्याने हळूहळू बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं. एवढंच नाही तर यशाचे शिखर गाठलं. 

3/7

शाहरुख खानसोबत सर्कस, नंतर भारत एक खोज आणि CID मध्ये तो झळकला. त्यानंतर त्यांने 1984 मध्ये होली या चित्रपटातून अभिनयाला सुरुवात केली. 

4/7

जोधा अकबर, पानिपत, व्हॉट्स युअर राशी, लगान, स्वदेस, मोहंजोदाडो असे असंख्य चित्रपट केले. शाहरुख खान, आमिर खान आणि ऋतिक रोशन या सारख्या अभिनेत्यांसोबत त्याने काम केलं. 

5/7

लगान या चित्रपटाला ऑस्करमध्ये नामांकन मिळाल्याने भारतीयांची मान उंचावली. फिल्मफेअर अवॉर्ड्सबद्दल बोलायचं झालं तर या चित्रपटाने 8 अवॉर्ड आपल्या नावावर केले होते. 

6/7

जोधा अकबर या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पुरस्कार पटकावला. ऐश्वर्या राय बच्चन सोबतचा हा चित्रपट आजही टीव्हीवर पाहिला जातो. 

7/7

आशुतोष गोवारीकरचं एकदा बॉलिवूड अवॉर्ड शोमध्ये साजिद खानसोबत तूतू मै मै झाली होती. साजिद खानने जोधा अकबर या चित्रपटावरुन स्टेजवर विनोद केला. तो विनोद आशुतोष याला आवडला नाही आणि त्यांच्यामध्ये वाद झाला.