Ganesh Chaturthi 2024: स्वप्नील जोशी ते सोनाली कुलकर्णी, मराठी कलाकारांच्या घरी बाप्पाचं आगमन, डेकोरेशनने वेधलं लक्ष

दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील मराठी कलाकारांच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. 

Soneshwar Patil | Sep 07, 2024, 13:17 PM IST
1/6

गणपती बाप्पा

लाडक्या गणपती बाप्पाला घरी आणण्यासाठी सर्वजण खूप दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत होते. तो सण अखेर आला आहे. अशातच मराठी कलाकारांनी देखील त्यांच्या घरी गणपती बाप्पाचं स्वागत केलं आहे. 

2/6

सोनाली कुलकर्णी

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. फोटोमध्ये सोनाली गणपती बाप्पाची पूजा करताना दिसत आहे. 

3/6

सायली संजीव

दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील अभिनेत्री सायली संजीव हिच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. तिने बाप्पासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

4/6

सुबोध भावे

अभिनेता सुबोध भावे याच्या घरी देखील गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. गणपती बाप्पासोबतचा फोटो शेअर करताना त्याने 'गणपती बाप्पा मोरया' असं कॅप्शन दिलं आहे. 

5/6

रुपाली भोसले

अभिनेत्री रुपाली भोसलेने काही दिवसांपूर्वी नवीन घर घेतलं आहे. या नवीन घरात तिने पहिल्यांदाच गणपती बाप्पाचं धुमधडाक्यात स्वागत केलं आहे. 

6/6

स्वप्नील जोशी

दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरी लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे.