PHOTO : राज कपूर नंतर बॉलिवूडचा सर्वात मोठा Show Man बनला हा चिमुकला! ओळखा पाहू…

Entertainment : चित्रपटसृष्टीत या चिमुकल्याला एन्ट्री घेण्यासाठी खूप पापड लाटावे लागले होते. पण त्या एका क्षणामुळे राज कपूरनंतर बॉलिवूडमचा सर्वात मोठा Show Man हा चिमुकला बनला होता. 

Jan 24, 2024, 12:54 PM IST
1/10

हा चिमुकला बॉलिवूडचे शोमन म्हणून ओळखला जातो. आज या चिमुकल्याचा 78 वा वाढदिवस आहे. 

2/10

ओळखलं का या चिमुकल्याला. हे आहेत दिग्दर्शक सुभाष घई. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, सुभाष यांनी अनेक चित्रपटांमध्ये मुख्य नायक म्हणूनही काम केलंय. 

3/10

24 जानेवारी 1945 रोजी नागपुरात जन्मलेल्या सुभाषचे स्वप्न बॉलीवूडमधील सर्वोत्तम हिरो बनण्यासाठी आले होते. 

4/10

अभिनेता म्हणून त्यांनी उमंग आणि गुमराह या चित्रपटात मुख्य भूमिकेतून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. मात्र त्यांची जादू प्रेक्षकांवर चालली नाही. 

5/10

बॉलिवूड तर सोडायचं नव्हतं मग त्यांनी दिग्दर्शन करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी बॉलिवूडला आपल्या तालावर नाचवायला सुरुवात केली. 

6/10

खरं तर सुभाष घई यांच्या प्रसिद्ध चित्रपटांची यादी बरीच मोठी आहे. पण कालीचरण, विश्वनाथ, कर्ज, हीरो, मेरी जंग, कर्मा, राम लखन, सौदागर, खलनायक, परदेस आणि ताल हे चित्रपट आजही आवर्जून पाहिले जातात. 

7/10

सुभाष घई यांच्या चित्रपटामुले बॉलिवूडला अनेक अभिनेत्या आणि अभिनेत्री मिळाल्यात. जॅकी श्रॉफ, रीना रॉय, मीनाक्षी, माधुरी दीक्षित, महिमा चौधरी आणि मनीषा कोईराला यांना ब्रेक दिला. 

8/10

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, सुभाष घई हे पहिले दिग्दर्शक होते ज्यांनी अभिनेत्रीला नो प्रेग्नेंस क्लॉजवर साइन करायला लावलं होतं. 

9/10

सुभाई घई यांनी आता दिग्दर्शकाचं काम थांबवलं असलं तरी ते लिखाण आणि निर्मिती क्षेत्रात काम करत आहेत. कांची द अनब्रेकेबल या शेवटचा चित्रपटाचं त्यांनी दिग्दर्शन केलं. त्यांनी दिग्दर्शन का थांबवलं हे स्पष्ट नाही. ते आता मुंबईच्या अॅक्टिंग स्कूलकडे लक्ष देतात. 

10/10

2018 मधील कॉंट्रोवर्सीनंतर त्यांनी या क्षेत्रात न राहण्याचा निर्णय घेतला असं म्हटलं जातं. मीटू प्रकरणात एका तरुणीने त्यांचं नाव घेतलं होतं. त्यानंतर त्यांनी या क्षेत्राला रामराम ठोकलं.