51 वर्षांनंतर अमिताभ आणि जया बच्चन यांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, पहा फोटो

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाला 51 वर्षे पूर्ण झाली आहेत. दोघांनी 1973 मध्ये लग्न केलं. पण त्यांच्या लग्नाची पत्रिका आजपर्यंत कोणी पाहिली नाही. पण सध्या त्यांच्या लग्न पत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Soneshwar Patil | Oct 03, 2024, 18:10 PM IST
1/7

लग्न पत्रिकेची झलक

आमिर खानने KBC वर सादर केलेल्या या जबरदस्त लग्नाच्या आमंत्रण पत्रिकेची एक झलक आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. 

2/7

कौन बनेगा करोडपती

यावेळी बॉलिवूड अभिनेता आमिर खान त्याचा मुलगा जुनैद खानसोबत 'कौन बनेगा करोडपती'च्या शोमध्ये सहभागी होणार आहे.

3/7

वैयक्तिक आयुष्य

या शोमध्ये त्याने अनेक प्रश्नाची उत्तरे दिली आहेत. पण त्यासोबतच अमिताभ बच्चन यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टी देखील उघड केल्या आहेत. 

4/7

लग्नाचा वाढदिवस

'कौन बनेगा करोडपती'च्या प्रोमोमध्ये आमिरने अमिताभ बच्चन यांना विचारले की, तुम्हाला लग्नाचा वाढदिवस आठवत नाही. त्यावर बिग बी म्हणाले की, 3 जून 1973 लक्षात आहे. 

5/7

लग्नाचा पुरावा

यानंतर आमिर खान म्हणतो सर, कृपया याचा काही पुरावा द्या, मी पुरावा देतो. तुमच्या लग्नाचे कार्ड माझ्याकडे आहे. तो त्यांना ते कार्ड देतो.

6/7

हरिवंशराय बच्चन

अमिताभ-जया यांच्या या साध्या दिसणाऱ्या लग्नपत्रिकेवर बिग बींचे वडील हरिवंशराय बच्चन यांच्या वतीने रामायणातील एका जोड्यासह हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत संदेश लिहिला आहे. 

7/7

बेस्ट सरप्राईज

या दोघांची जुनी लग्नपत्रिका पाहून चाहते देखील थक्क झाले. म्हणाले, अमिताभ सरांसाठी बेस्ट सरप्राईज. हे फक्त आमिर खानच करू शकतो. असं चाहते म्हणाले आहेत.