'MS Dhoni ने वर्ल्ड कप जिंकला नव्हता तर...', Mr. 360 ने मिसळला गंभीरच्या सुरात सूर

AB de Villiers On MS Dhoni : टीम इंडियाने 2011 च्या वर्ल्ड कपवरून अनेक वाद समोर येतात. त्यावरून डिव्हिलिअर्सने देखील मोठं वक्तव्य केलंय.

Sep 26, 2023, 17:14 PM IST

ICC World Cup 2023 : टीम इंडियाने 12 वर्षापूर्वी वर्ल्ड कपवर नाव कोरलं होतं. धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने विजयी पताका रोवला होता. त्यावर आता ए.बी. डिव्हिलिअर्स याने मोठं वक्तव्य केलंय.

1/7

धोनीवर टीका

टीम इंडियाचा माजी वर्ल्ड कप विजेता सलामीवीर गौतम गंभीर याने अनेकदा धोनीवर खोचक टीका केली आहे. 

2/7

गौतम गंभीर

वर्ल्ड कप धोनीने एकट्याने नाही तर आम्ही टीमने जिंकलाय. मात्र, मार्केटिंग मात्र नेहमी धोनीची केली जाते, असं गंभीर म्हणतो.

3/7

डिव्हिलिअर्स म्हणे...

अशातच आता डिव्हिलिअर्सने देखील गंभीरच्या सुरात सूर मिसळला आहे. त्यावेळी त्याने टीमच्या योगदानाबद्दल विधान केलं आहे.

4/7

क्रिकेट

मी कधीही वर्ल्ड कप जिंकलो नाहीये. आजच्या काळात लोक विसरले आहेत की, क्रिकेट एक संघ आहे. 

5/7

एमएस धोनी

लोक म्हणतात धोनीने विश्वचषक जिंकला, त्याने जिंकला. एमएस धोनी याने विश्वचषक जिंकला नव्हता, भारतीय संघाने विश्वचषक जिंकला होता. हे आपल्या डोक्यात ठेवा आणि विसरू नका, असं वक्तव्य डिव्हिलियर्सने केलं आहे.  

6/7

जॉस बटलर

लॉर्ड्समध्ये जॉस बटलरने ट्रॉफी उंचावली नव्हती, तर इंग्लंडने ट्रॉफी जिंकली होती. एक संघ जेव्हा वर्ल्ड कप जिंकतो, तेव्हा सर्वांचा विजय असतो, असं डिव्हिलियर्स म्हणालाय.

7/7

Mr. 360

टीममध्ये खेळाडूंसोबतच सपोर्ट स्टाफ, निवडकर्ते, बोर्डाचे अधिकारी आणि राखीव खेळाडूंचं योगदान देखील असतं, असं देखील Mr. 360 म्हणाला आहे.