Konkan Railway Mega Block : काेकण रेल्वे मार्गावर मेगाब्लाॅक

कोकण रेल्वे मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. काेकण रेल्वे मार्गावर आज चार तासांचा मेगाब्लाॅक घेण्यात आला आहे.

Surendra Gangan | Jun 15, 2023, 09:31 AM IST
1/5

Konkan Railway Mega Block : कोकण रेल्वे मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कोकण रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मडगाव तसेच कुमटा सेक्शन दरम्यान हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. रुळांची दुरुस्ती, ओव्हरहेड वायर दुरुस्ती, सिंगल यंत्रणेची दुरुस्ती अशा विविध मालमत्तेच्या देखभालीच्या कामासाठी हा मेगाब्लॉक असणार आहे.  

2/5

 मालमत्ता देखभालीच्या कामासाठी कोकण रेल्वे मार्गावर मडगाव तसेच कुमटा सेक्शन दरम्यान आज  15 जून रोजी चार तासांचा हा ब्लॉक घेण्यात आला आहे.

3/5

चार तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याने काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. आज सकाळी 11 वाजल्यापासून हा मेगाब्लॉक सुरु होणार आहे. ताे दुपारी 3 वाजेपर्यंत राहणार आहे.

4/5

या मेगा ब्लॉकमुळे कोकण रेल्वेच्या मडगाव ते कुमठा सेक्शनमधून धावणारी 06602 मंगळुरु सेंट्रल ते मडगाव जंक्शन विशेष गाडी कुमटा स्थानकापर्यंतच धावणार आहे. 

5/5

कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार कुमटा ते मडगाव स्थानकादरम्यान मंगळुरु सेंट्रल ते मडगाव जंक्शन ही गाडी अंशतः रद्द करण्यात आली आहे. याचबरोबर गाडी क्रमांक 06601 मडगाव -मंगळुरु जंक्शन या गाडीचा प्रवास कुमट्यापासून सुरु होणार आहे.