दिवसाला 2 कोटी कमवणाऱ्या 23 वर्षीय तरुणाचा श्रीमंतीचा गुरुमंत्र; म्हणाला, "9 ते 5 Job करुन..."

9 to 5 Job Wasting Lives: तो केवळ 23 वर्षांचा आहे. पूर्वी तो सुद्धा 9 ते 5 नोकरी करायचा. मात्र त्याने एक निर्णय घेतला आणि त्याचं आयुष्य बदललं. आज तो दिवसाला 2 कोटी रुपये कमवतो. आलिशान आयुष्य जगतो. आपण जसं आयुष्य जगायचं स्वप्न पाहिलं होतं तसेच आपण जगत असल्याचं तो सांगतो. मात्र आपण केलेली गोष्ट अनेकजण करायला घाबरतात त्यामुळेच ते 9 ते 5 काम करुन आयुष्य खराब करुन घेत असल्याचा त्याचा दावा आहे. हा तरुण आहे तरी कोण? त्याने नेमकं काय केलंय? आणि तो 9 ते 5 नोकरीवर टीका का करतो जाणून घेऊयात...

Swapnil Ghangale | Jul 17, 2023, 13:46 PM IST
1/12

Cam Moar tells secret to be rich

9 to 5 job wasting lives: जे लोक 9 ते 5 नोकरी करतात ते आपलं आयुष्य उद्धवस्त करत असून ते आयुष्य फुकट वाया घालवत आहेत, असा दावा वयाच्या 23 व्या वर्षी आपल्या बुद्धीच्या जोरावर कोट्याधीश झालेल्या तरुणाने केला आहे. कॅम मोआर असं नोकरदारवर्गाबद्दल असं थोडं संतापजनक वाटणारं विधान करणाऱ्या मुलाचं नाव आहे.

2/12

Cam Moar tells secret to be rich

कॅमने स्वत: नोकरी करत नाही. त्याने सुरुवातीला तसा प्रयत्न केला मात्र काळी काळातच त्याने नोकरी सोडली आणि आता तो इतरांनाही नोकरी सोडण्याचा सल्ला देतोय. 

3/12

Cam Moar tells secret to be rich

सध्या कॅम, मी फार समाधानी असल्याचे सांगतो. पण हा कॅम आहे तरी कोण? कॅम हा एका नवउद्यमी म्हणजेच स्टार्टअपचा संस्थापक आहे आहे. 'द सन'ने दिलेल्या वृत्तानुसार कॅमने एक ई कॉमर्स व्यवसाय सुरु केला आहे.

4/12

Cam Moar tells secret to be rich

आपल्याप्रमाणे आलीशान आयुष्य जगण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी कॅम एक मोलाचा सल्ला देतो. त्यांच्या सांगण्याप्रमाणे कोणालाही हे असं जगणं शक्य आहे. स्वत: कॅम हा आधी लाकूडकामाचं प्रशिक्षण घ्यायचा. मात्र त्याने 6 महिन्यातचं हे ट्रेनिंग सोडलं.

5/12

Cam Moar tells secret to be rich

कॅम हा दक्षिण ऑस्ट्रेलियामध्ये राहतो. कॅमप्रमाणे जगण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना तो इतकंच सांगतो की, असं आयुष्य जगणं कोणालाही शक्य आहे. कॅम हा कारपेन्टर म्हणजेच सुतारकाम करण्यासंदर्भातील प्रशिक्षण घेत होता. मात्र प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण होण्याच्या 6 महिने आधीच कॅम या प्रशिक्षण वर्गातून बाहेर पडला. इतक्या कमी मानधनासाठी 12-12 तास राबणे योग्य नाही असं कॅमचं म्हणणं होतं.

6/12

Cam Moar tells secret to be rich

कॅमने 2020 साली कार्पेटींगचं क्षेत्र सोडलं आणि ई कॉमर्समध्ये काहीतरी करण्याचं त्याने ठरवलं. त्याने हिंमत करुन घेतलेला हा निर्णय त्याच्या पथ्याशी पडला. आता तो महिन्याला 2 कोटी रुपये कमवतो.

7/12

Cam Moar tells secret to be rich

'डेली मेल'ला दिलेल्या माहितीनुसार जेव्हा मोठ्या प्रमाणात पैसा मिळू लागला तेव्हा आपल्यालाच आश्चर्य वाटू लागलं असं कॅम म्हणाला. "अर्थात यात धोका होताच कारण मी शुन्यातून सुरुवात केली. मात्र हेच करायला लोक फार घाबरतात. मात्र असे घाबरणारे लोक काहीही विचार न करता आपलं आयुष्य खराब करुन घेत आहेत," असं कॅम म्हणाला.

8/12

Cam Moar tells secret to be rich

कॅम हा सोशल नेटवर्किंगवर सक्रीय असून तो अनेकदा सुट्ट्यांवर असल्याचे आणि आयुष्य एन्जॉय करत असल्याचे फोटो पोस्ट करतो. 

9/12

Cam Moar tells secret to be rich

कॅम अगदी आत्मविश्वासाने लोकांनी 9 ते 5 जॉब सोडावा असा सल्ला देतो. कॅम त्याच्या लेक्चर्समधूनही हेच सांगतो. यासाठी कॅम स्वत:चेच उदाहरण देतो. "लोक त्यांच्या आयुष्याबरोबर नेमकं काय करत आहेत याचा विचार करणं गरजेचं आहे. 9 ते 5 च्या शिफ्टमध्ये काम करुन आयुष्य खराब करुन घेण्याशिवाय ते आयुष्याबरोबर नेमकं काय करत आहेत याचा त्यांनी विचार केला पाहिजे," असं कॅम म्हणतो.

10/12

Cam Moar tells secret to be rich

कॅमच्या सध्या साडेसहा कोटी रुपयांच्या घरात राहतो. कॅम नुकतीच बीएमडब्ल्यू एम 5 कारचा मालक झाला आहे.

11/12

Cam Moar tells secret to be rich

"शाळेत जायचं, डिग्रीपर्यंत शिकायचं आणि उद्योगात अडकून जायचं असं आपल्याला लहानपणापासून शिकवतात. घर खरेदी करा अन् त्यानंतर आयुष्यभर त्याचे पैसे फेडण्यात घालवा. मी अशाच विचारांसहीत काम करत होतो. मात्र एवढ्या कटाटोपानंतर मी किती पैसे कमवू शकतो याचा हिशोब लावल्यानंतर यातून बाहेर पडायचं ठरवलं," असं कॅम सांगतो. 

12/12

Cam Moar tells secret to be rich

सध्या जगतोय तसेच जगण्याची कॅमची इच्छा होती. 'सिक्स फिगर ड्रॉप शिपर' नावाच्या कंपनीच्या माध्यमातून ई-कॉमर्स इंडस्ट्रीबद्दलची लेक्चर्स तो देतो. त्याने आतापर्यंत अडीच हजारांहून अधिक जणांना लेक्चर दिलं आहे.