मुंबईत समुद्राच्या मध्यभागी असलेली 600 वर्ष जुनी चमत्कारिक वास्तू; फक्त भारतातच नाही सपूर्ण जगात प्रसिद्ध

‘हाजी अली दर्गा’ भर समुद्रात बांधण्यात आला आहे. अशा प्रकारची ही देशातील एकमेव वास्तू आहे. मुंबईत येणारे आवर्जून हाजी अली दर्गाला भेट देतात. 

वनिता कांबळे | Oct 13, 2024, 22:00 PM IST

Mumbai Haji Ali Dargah History:  मुंबईही देशाची आर्थिक राजधानी आहे. यासह मुबंईला एक ऐतिहासिक वारसा देखील लाभला आहे. यामुळेच मुंबई जगभरातील पर्यटकांचे आकर्षण देखील आहे. समुद्राच्या मधोमध असलेला चमत्कारिक हाजी अली दर्गा नेहमीच पर्टकांना आकर्षित करत असतो. मुस्लीम धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या हाजी अली दर्ग्याला सर्वधर्मीय पर्यटक भेट देत असतात. हाजी अली दर्गा हे सागरातील अलौकिक स्मारक आहे.

1/10

हाजी अली दर्गा अत्यंत चमत्कारिक वास्तू मानली जाते. कारण 26 जुलै 2006 रोजी मुंबईत तुफान पाऊस पडला. समुद्रात मोठ्या लाटा उसळल्या होत्या. सर्वत्र मोठे नुकसान झाले होते. मात्र, सर्वत्र मोठा विनाश झाला असताना हाजी अली दर्ग्याचे काहीच नुकसान झाले नव्हते. 

2/10

समुद्र कितीही खवळला असला आणि किती उंच लाटा उसळत असल्या तरी समुद्राचे पाणी दर्ग्याच्या आत शिरत नाही. रस्त्या पाण्याखाली गेल्यावर दर्ग्यात आता असलेल्या लोकांना बाहेर जाता येतनाही आणि आता असलेल्यांना बाहेर पडता येत नाही.  

3/10

समुद्राच्या किनाऱ्यापासून दर्ग्यापर्यंत जाण्यासाठी सिमेंटचा रस्ता आहे. समुद्राला भरती आल्यावर हा रस्ता पाण्याखाली जातो.

4/10

 बाबा हाजी अली आणि त्याचा भाऊ आणि आई यांच्या परवानगीने ते मुंबईतील वरळी भागात राहायला आले होते. मात्र, इस्लामचा प्रचार करण्यासाठी ते येथेच राहिले. 

5/10

सुंदर आणि भव्य दर्गा मुंबईच्या मध्यभागी बांधला आहे. ज्याची देखभाल सुन्नी गटातील बरेलवी पंथ करतात.

6/10

हाजी अली दर्गा हा मुस्मिम बांधवांचे श्रद्धास्थान आहे. येथे मनापासून प्रार्थना केल्यावर इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते.

7/10

या दर्ग्याचे बांधकाम पांढऱ्याशुभ्र ‘मक्करा’ संगमरवरांनी केले आहे.   

8/10

 हाजी अली दर्ग्याची स्थापना इसवी सन 1631  मध्ये झाली. 

9/10

  4.500  चौ. मीटर क्षेत्रात हाजी अली दर्गा  पसरलेला आहे.याचे बांधकाम सुमारे 85 फूट उंचीचे आहे. समुद्राच्या मदोमध असलेल्या या दर्ग्याची भव्यता दूरनही पाहता येते.

10/10

 हाजी अली दर्गा इस्लामिक वास्तुशैलीचा उत्तम नमुना आहे. याच्यावर मुघल व इंडो-इस्लामिक बांधकाम शैलीचा प्रभाव  दिसतो.