23 वर्षाच्या महिलेला 11 मुलं, 100 हून अधिक मुलांची हवीय फॅमिली

Feb 13, 2021, 16:08 PM IST
1/8

`हम दो-हमारे दो` वर नाही विश्वास

`हम दो-हमारे दो` वर नाही विश्वास

आजच्या युगात जेव्हा संपूर्ण जग 'हम दो-हमारे दो' या तत्त्वाचे अनुसरण करण्याचे म्हणते तेव्हा जॉर्जियाच्या क्रिस्टीना ओझटार्क त्याला मूर्खपणाचे म्हणते. ती म्हणते की, मी सर्व मुलांना योग्य मार्गाने वाढवू शकते आणि त्यांना चांगले जीवन देऊ शकते. म्हणून कुटुंब वाढवण्यास आणि जास्त मुलांना जन्म देण्यास काही अडचण नाही.  

2/8

क्रिस्टीना ओज्टर्कला मुलांवर प्रेम

क्रिस्टीना ओज्टर्कला मुलांवर प्रेम

क्रिस्टीना ओझटार्कला मुलं खूप आवडतात. ती केवळ 23 वर्षांची आहे, परंतु या वयात ती 11 मुलांना संभाळत आहे. त्यांची मोठी मुलगी 6 वर्षांची आहे. म्हणजेच, वयाच्या 17 व्या वर्षीच ती आई बनली.

3/8

करोडोंची संपत्ती

करोडोंची संपत्ती

क्रिस्टीना ओझटार्क एक श्रीमंत कुटुंबातील आहे. आणि त्यांच्याकडे कोट्यावधींची संपत्ती आहे. इतकेच नव्हे तर ती आपल्या कुटुंबामुळे इंस्टाग्रामसारख्या सोशल नेटवर्किंग साइटवर सुपरस्टारप्रमाणे जीवन जगते. ती आपल्या मुलांबरोबरचे फोटो पोस्ट करत राहते.  

4/8

जॉर्जियामध्ये राहतो परिवार

जॉर्जियामध्ये राहतो परिवार

क्रिस्टीना ओझटार्क म्हणाली की, मला माझ्या कुटुंबाची भरभराट थांबवायची नाही. मला अधिकाधिक मुले हवी आहेत. कारण माझ मुलांवर खूप प्रेम आहे. त्यांचे पालनपोषण करताना मला आनंद होतो. क्रिस्टीनाचा पती गॅलिप ऑझटार्क 56 वर्षांचा आहे आणि तो एक मोठा उद्योगपती आहे. क्रिस्टीनाचा जन्म रशियाच्या मॉस्को येथे झाला, तर पती गॅलिपचा जन्म तुर्कीमध्ये एका मोठ्या कुटुंबात झाला. पण आता हे कुटुंब जॉर्जियात राहत आहे.

5/8

105 मुलांची इच्छा

105 मुलांची इच्छा

जॉर्जियातील दुसर्‍या क्रमांकाचे शहर बटुमी येथे राहणाऱ्या कुटुंबाने एका मीडिया हाऊसला सांगितले की, त्यांना 105 मुले हवी आहेत. तथापि, दरम्यान, क्रिस्टिनानेही आपल्या मोठ्या मुलीला जन्म दिल्याचा खुलासा केला. बाकीची मुले सरोगसीने जन्माला आली आहेत.

6/8

सेरोगेसीच्या माध्यमातून मुलांना जन्म

सेरोगेसीच्या माध्यमातून मुलांना जन्म

क्रिस्टीना म्हणाली की, मुलांना जन्म देणे आणि त्यांचे चांगल्या प्रकारे संगोपन करणे या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत. मला मुलांना वाढवताना आनंद होतो.ही मुले आमची जैविक मुले आहेत. सरोगसीच्या माध्यमातून आम्ही त्यांना जन्म दिला आहे.    

7/8

सेरोगेसीवर बंदी नाही

सेरोगेसीवर बंदी नाही

सरोगसीबद्दल विचारले असता तिने सांगितले की, बटुमी शहरात बरीच सेरोगेसी क्लिनिक आहेत. अशा परिस्थितीत कोणत्या आईने मुलाला जन्म दिला हे त्यांना ठाऊक नसते. हे क्लिनिक आणि ती महिला या दोघांमध्येच असते.  

8/8

80 कोटी रुपये खर्च करण्याची तयारी

80 कोटी रुपये खर्च करण्याची तयारी

जॉर्जियामध्ये सेरोगेसी बेकायदेशीर नाही. या प्रक्रियेची किंमत सुमारे 8 हजार युरो आहे. भारतीय चलनात हे 8 लाखाहून अधिक आहे. अशा परिस्थितीत क्रिस्टीनाला 100 मुले असा परिवार हवा असेल तर तिला केवळ 80 मुलांच्या जन्मासाठी 80 कोटींपेक्षा जास्त खर्च करावा लागेल. त्यानंतर या मुलांच्या संगोपनावर आणि शिक्षणासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जातील. क्रिस्टीना मात्र यासाठी सज्ज आहे. आणि तिचा नवरा नेहमीप्रमाणेच या निर्णयावर तिला पाठिंबा देत आहे. (फोटो सौजन्य : Insta/batumi_mama)