1 तास 46 मिनिटांचा अंगावर काटा आणणारा हॉरर चित्रपट, एका राक्षसाने केला 3 मित्रांवर अत्याचार; भीतीने येणार नाही झोप

 2022 Biggest Horror Film: या चित्रपटात आत्मा किंवा भूत नाही, तर एका जिनने तीन मित्रांवर अशा प्रकारे कहर केला की, त्यांचे आयुष्य नकोसे झाले.  

तेजश्री गायकवाड | Jan 22, 2025, 13:50 PM IST

 2022 Biggest Horror Film: या चित्रपटात आत्मा किंवा भूत नाही, तर एका जिनने तीन मित्रांवर अशा प्रकारे कहर केला की, त्यांचे आयुष्य नकोसे झाले.

 

1/7

2022 Biggest Horror Film: गेल्या काही वर्षांत प्रेक्षकांमध्ये हॉरर चित्रपटांची क्रेझ झपाट्याने वाढली आहे. मग ती एक हॉरर कॉमेडी असो किंवा अतिशय भितीदायक दृश्यांनी भरलेली संपूर्ण हॉरर फिल्म असो. आज आम्ही तुम्हाला 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या अशाच एका भयानक भयपटाबद्दल सांगणार आहोत. या चित्रपटात आत्मा किंवा भूत नाही, तर एका जिनने तीन मित्रांवर अशा प्रकारे कहर केला की, त्यांचे आयुष्य नकोसे झाले.

2/7

2022 चा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट हॉरर चित्रपट

जर तुम्हालाही हॉरर चित्रपट पाहायला आवडत असेल तर  एक भयानक चित्रपटाचे सजेशन आम्ही घेऊन आलो आहोत. या चित्रपटाची कथा कोणत्याही आत्मा किंवा भूताची नसून एका जिनची आहे, ज्याचा कहर तीन मित्रांवर अशा प्रकारे पडतो की त्यांचे उठणे, बसणे, खाणे, पिणे आणि झोपणे बंदी बनते. चला तुम्हाला या भयानक हॉरर चित्रपटाबद्दल जाणून घेऊयात. 

3/7

1 तास 46 मिनिटांचा भितीदायक चित्रपट

तुम्ही सर्वांनी कधी ना कधी जिनबद्दल ऐकले असेलच की, एकदा ते एखाद्याच्या मागे लागले की त्याचे जीवन नरक बनवतात. या चित्रपटाचीही अशीच कथा आहे. हा चित्रपट तीन मित्रांभोवती फिरतो, जे एका जिनच्या प्रभावाखाली येतात. हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात मोठी कास्ट दिसत नसली तरी हा चित्रपट खूप आवडला आणि या चित्रपटाने सर्वांना घाबरवले. 'असेक' (aseq) असे या चित्रपटाचे नाव आहे.

4/7

कोण आहेत कलाकार?

या चित्रपटाचे दिग्दर्शन सरीम मोमीन यांनी केले आहे. वर्धन पुरी, सोनाली सहगल, सिद्धांत कपूर, एलेना रोक्साना मारिया फर्नांडिस, आदि चुघ, ज्युलियन गिलार्ड आणि एम्मा कॉलर सारखे कलाकार या चित्रपटात दिसत आहेत.

5/7

कशी आहे कथा?

चित्रपटाच्या कथेत, प्रियांका (एलेना रोक्साना) पासून विभक्त झाल्यानंतर, रॉनी (वर्धन पुरी) लैल (सोनाली सहगल) च्या प्रेमात पडतो, परंतु त्याच्यासोबत काही विचित्र घटना घडू लागतात, ज्याचा परिणाम त्याचे मित्र सारेम आणि आदिवर होतो जे त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतात.   

6/7

भयानक ट्विस्ट

कथेच्या शेवटी अनेक भयानक ट्विस्ट आहेत, जे तुम्हालाही आश्चर्यचकित करतील. ते या गोष्टींना कसे सामोरे जातात आणि स्वतःला कसे वाचवतात हे पाहणे खरोखरच इंटरेस्टिंग आहे. या चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे कोणताही मोठा चेहरा नसतानाही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर यश मिळवले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाचे एकूण बजेट 10 कोटी रुपये होते, ज्याने बॉक्स ऑफिसवर 15 कोटी रुपयांची कमाई केली आणि आता OTT वर ट्रेंड करत आहे.

7/7

कुठे पहायचा चित्रपट?

या चित्रपटाला IMDb वर 5.4 रेटिंग आहे. जर तुम्हाला हा चित्रपट पाहायचा असेल तर तुम्ही तो OTT प्लॅटफॉर्म Jio Cinema वर पाहू शकता किंवा तुम्ही YouTube वर देखील विनामूल्य पाहू शकता.