घरात 115 मृतदेह, शवपेट्या अन् गूढ! दुर्गंधीच्या तक्रारीनंतर आलेले पोलीस समोरचं दृष्य पाहून हादरले

115 Decaying Dead Bodies: काही रहिवाशांनी शेजारच्या घरातून दुर्गंधी येत असल्याची तक्रार केल्यानंतर पोलिसांनी या घरावर छापा टाकला. पोलिसांनी या घरामध्ये प्रवेश केला असता त्यांना धक्काच बसला. या घरात कुजलेल्या अवस्थेतील 115 मृतदेह पोलिसांना आढळून आले आहेत. नक्की घडलं काय आणि कसं जाणून घ्या...

Swapnil Ghangale | Oct 08, 2023, 17:21 PM IST
1/11

115 Decaying Dead Bodies Found In Colorado Green Funeral Home Property

आम्ही आत प्रवेश केला तेव्हा परिस्थिती फारच भयानक होती, असं पोलिसांनीही म्हटलं आहे. नेमकं घडलं काय आणि कुठे तसेच या प्रकरणामध्ये कोणती माहिती समोर आली आहे पाहूयात सविस्तर...

2/11

115 Decaying Dead Bodies Found In Colorado Green Funeral Home Property

अमेरिकेतील कोलेरॅडो येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोलेरॅडोमधील एका घरासारख्या इमारतीमध्ये  115 मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आले आहेत. ते ठिकाणी निसर्गाला हानी न पोहचवता मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या कंपनीकडून वापरले जात असल्याचा दावा केला जातोय. हे ठिकाणी ग्रीन फ्युनरल होम म्हणून स्थानिकांमध्ये प्रसिद्ध होतं.

3/11

115 Decaying Dead Bodies Found In Colorado Green Funeral Home Property

कोलेरॅडोमधील काही नागरिकांनी ग्रीन फ्युनरल होममधून मागील काही दिवसांपासून सातत्याने दुर्गंधी येत असल्याची तक्रार पोलिसांकडे केली. हे ठिकाण अंत्यसंस्काराची व्यवस्था करणाऱ्या एका कंपनीकडून गोदम म्हणून वापरलं जायचं असंही स्थानिक सांगतात.

4/11

115 Decaying Dead Bodies Found In Colorado Green Funeral Home Property

पोलिसांना तक्रार मिळाल्यानंतर त्यांनी या ठिकाणावर छापेमारी केली. मात्र दुर्गंधीमुळे पोलिसांना या ठिकाणी प्रवेशही करता येत नव्हता.

5/11

115 Decaying Dead Bodies Found In Colorado Green Funeral Home Property

कसाबसा पोलिसांनी या ठिकाणी प्रवेश केला. मात्र आतमधील दृष्य पाहून त्यांना धक्काच बसला. या गोदामवजा घरामध्ये चक्क 115 मृतदेह अर्ध्या सडलेल्या आणि कुजलेल्या अवस्थेत आढळून आले.

6/11

115 Decaying Dead Bodies Found In Colorado Green Funeral Home Property

कोलेरॅडोमधील या प्रकरणाची शुक्रवार रात्रीपासून चौकशी केली जात आहे. हे ठिकाणी पेनरोजमधील 'रिटर्नस टू नेचर फ्युनरल होम' कंपनीच्या नावावर असल्याची माहिती समोर आली आहे.

7/11

115 Decaying Dead Bodies Found In Colorado Green Funeral Home Property

या ठिकाणी सापडलेले मृतदेह एवढ्या छिन्नविछिन्न अवस्थेत आहेत की पोलिसांनी विमान अपघात तज्ज्ञ, तपासावर लक्ष ठेवण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील न्यायव्यवस्थेमधील अधिकारी आणि एफबीआयलाही पाचारण केलं आहे.

8/11

115 Decaying Dead Bodies Found In Colorado Green Funeral Home Property

या प्रकरणामध्ये संबंधित जागेची मालकी असलेल्या कंपनीचा म्हणजेच फ्युनरल पार्लरचा मालक जोन हॅलफोर्डचं (फोटोमध्ये लाल बाणाने दर्शवलेली व्यक्ती) नाव समोर आलं आहे. जोन ही जागा चुकीच्या पद्धतीने शवपेट्यांची साठवण करण्यासाठी वापरत होता, असं तपासात समोर आलं आहे.

9/11

115 Decaying Dead Bodies Found In Colorado Green Funeral Home Property

115 मृतदेहांच्या प्रकरणामध्ये अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणामध्ये तपास यंत्रणांनी संबंधित कंपनीकडून लेखी खुलासा मागवला आहे. या कंपनीमध्ये फोनवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कोणीही फोन उचलेला नाही.

10/11

115 Decaying Dead Bodies Found In Colorado Green Funeral Home Property

या ठिकाणी काही गुन्हेगारी कारवाया होत होत्या का? आतमध्ये सापडलेले मृतदेह नेमके कोणाचे आहेत? ते तिथे कधीपासून आहेत? यासारख्या प्रश्नांचा शोध पोलीस घेत आहेत. अनेक छोट्या मोठ्या आकाराच्या शवपेट्याही या ठिकाणी सापडल्या. फ्रिमोंट काऊंटीचे शेरीफ अॅलन कूपर यांनी या इमारतीमध्ये प्रवेश केला तेव्हा अवस्था फारच भयानक होती असं म्हटलं आहे. 

11/11

115 Decaying Dead Bodies Found In Colorado Green Funeral Home Property

हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर अमेरिकेतील शवागरे आणि अंत्यसंस्कार पार पडतात त्या फ्युनरल होम्ससंदर्भातील नियमांबद्दल फेरविचार करण्याची तसेच नियम अधिक कठोर करण्याची मागणी केली जात आहे.