'हे' 10 पदार्थ आतड्यांना चिकटून शरीर पिळवटून काढतात, आजच बंद करा, WHO चा दावा
निरोगी जीवनशैलीत अन्नाची मोठी भूमिका असते. तुम्हालाही निरोगी आणि दीर्घायुष्य जगायचे असेल तर हा लेख जरुर वाचा. येथे 10 चुकीच्या पदार्थांबद्दल सांगणार आहोत ज्यापासून तुम्ही लांब राहणेच गरजेचे आहे. डब्ल्यूएचओने त्यांना मधुमेह, कोलेस्टेरॉल आणि अगदी कॅन्सर सारख्या घातक आजारांचे खरे कारण देखील घोषित केले आहे.
10 Unhealthy Food : खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि खराब दैनंदिन दिनचर्येमुळे आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या निर्माण होत आहेत. लहान वयातच, मधुमेह, कोलेस्ट्रॉल आणि हृदयाशी संबंधित आजारांना बळी पडत आहेत. फास्ट फूड आणि बटाटा चिप्स, कुकीज, पिझ्झा आणि बर्गर यांसारखे प्रक्रिया केलेले पदार्थ आरोग्यावर वाईट परिणाम करतात आणि लवकरच शरीराला रोगांचे घर बनवतात. अशा परिस्थितीत WHO च्या म्हणण्यानुसार, ज्या लोकांना दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य हवे आहे, त्यांनी विलंब न करता अशा चुकीच्या पदार्थांचा आहारात वापर मर्यादित केला पाहिजे.