मुंबई : अनेक जण त्यांच्या स्मार्टफोमधल्या इंटरनेट स्पीडमुळे हैराण झालेले असतात. त्यांना हवा तसा इंटरनेट स्पीड मिळत नाही. 3G आणि 4G प्लान असतांनाही इंटरनेटला तसा स्पीड मिळत नाही. पण काही अशा टीप्स आहेत ज्याने तुम्ही तुमच्या मोबाईलमधील इंटरनेटचा स्पीड वाढवू शकता.
- सर्च करण्यासाठी वेगवेगळ्या ब्राउजरचा वापर केला जातो. पण गूगल क्रोम हे अँड्रॉईड फोनसाठी चांगलं आहे. सगळ्या फोनमध्ये हे आधीपासून दिलंलं असतं. हा डिफॉल्ट ब्राउजर देखील असतो. जर तुम्ही त्याची सेंटीगमध्ये जाऊन काही बदल केले तर त्यामुळे तुमचा मोबाईल स्पीड वाढू शकतो.
- तुमच्या अॅपच्या cacheला नेहमी क्लियर करत राहिलं पाहिजे. cache क्लियर न झाल्यास इंटरनेट स्लो चालतो. हे डिलीट करण्यासाठी सेटींगमध्ये जाऊन अॅप निवडून क्लियर cacheवर क्लिक करा.
- इंटरनेटची स्पीड वाढवण्यासाठी तुम्ही थर्ड-पार्टी अॅप अनइंस्टॉल करा. या अॅपमुळे मोबाईल इंटरनेट स्पीड कमी होतो. कस्टम फीचर काढून टाका आणि अनइंस्टॉल करा.
- ब्राउजरला नेहमी टेक्स्ट सर्च मोडवर ठेवा. यामुळे अनावश्यक रुपात उघडणारी इमेज नाही उघडणार. गूगल प्ले स्टोरवर मिळणारे अॅप सामान्यपणे या फीचरला सपोर्ट नाही करत. पण तुम्ही सहज सेंटीगमध्ये जाऊन त्याला मिळवू शकता. पण जेव्हा तुम्ही असं करता तेव्हा इमेज अनावश्यक रूपात लोड नाही होत. यामुळे तुमचा मोबाईल स्पीड वाढतो.