नवी दिल्ली : आत्तापर्यंत रिलायन्स जिओ मोफत वापरणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. कारण, त्यांच्यासाठी एक धक्कादायक बातमी आहे.
जिओच्या वापरकर्त्यांना येत्या ४ डिसेंबरपासून इंटरनेट वापराचे पैसे द्यावे लागू शकतात. ही ऑफर अगोदर येत्या ३१ डिसेंबर रोजी संपणार होती. परंतु, आता ही ऑफर ३ डिसेंबर रोजी संपुष्टात येऊ शकते. कारण, ट्रायच्या सध्याच्या नियमांनुसार, कोणताही ऑपरेटर ९० दिवसांहून जास्त वेळ यूझर्सला वेलकम ऑफर देऊ शकत नाही.
याच पार्श्वभूमीवर रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी १ डिसेंबर रोजी एक महत्त्वाची घोषणा करणार आहेत. कंपनीच्या सोशल मीडिया चॅनल्सवर हा कार्यक्रम १.३० वाजता लाईव्ह प्रसारित होणार आहे.
जिओनं आपली वेलकम ऑफर ५ सप्टेंबर रोजी लॉन्च केली होती. त्यानुसार, ही ऑफर ३ डिसेंबर रोजी संपणार आहे. या तारखेपर्यंत ज्या लोकांनी ही ऑफर स्वीकारलीय त्यांना ३१ डिसेंबरपर्यंत अनलिमिटेड डेटा आणि फ्री अनलिमिटेड कॉल्सची सुविधा मिळू शकेल.
परंतु, जे लोक ३ डिसेंबर नंतर जिओ सर्व्हिस घेतील त्यांना कंपनीचा कमर्शिअल प्लान घ्यावा लागेल.