www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी लवकरच रेल्वे बोर्डातर्फे देशातील तरुणांसाठी उपलब्ध झालीय. रेल्वे बोर्डानं तब्बल २६ हजारांपेक्षा जास्त जागांसाठी तरुणांना अर्ज करण्याचं आवाहन केलं आहे.
भारतीय रेल्वे बोर्डानं सहाय्यक लोको पायलट आणि तंत्रज्ञांची तब्बल २६,५६७ पदांसाठी ही भरती जाहीर केलीय. अहमदाबाद, अजमेर, अलहाबाद, बेंगळुरू, भोपाळ, भुवनेश्वर, बिलासपूर, चंदीगड, चेन्नई, गोरखपूर, गुवाहाटी, जम्मू-कश्मीर, कोलकाता, मालदा, मुंबई, मुझफ्फरपूर, पटना, सिंकदराबाद, सिलीगुडी, तिरुवअनंतपुरम आणि रांची रेल्वे बोर्डाने ही भरती करण्याचा निर्णय घेतलाय.
टेक्नीशियन आणि लोको पायलट पदांसाठीची लेखी परीक्षा १५ जून २०१४ रोजी घेण्यात येईल. यासाठी उमेदवार १८ ते ३० वयोगटातील तसंच दहावी, बारावी उर्त्तीण असावा, ही अट आहे.
तुम्हीही या भरतीसाठी पात्र असाल तर लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करू शकता. अर्ज भरण्याची मुदत १७ फेब्रुवारी २०१४ पर्यंत आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.