मुंबई : कॅनडास्थित मोबाईल कंपनी ब्लॅकबेरीनं आपला नवा आणि महत्त्वाचं म्हणजे खिशाला परवडणारा स्मार्टफोन Z3 लॉन्च केलाय.
हा स्मार्टफोन मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये सादर करण्यात आला होता. आपला ढासळलेला विक्रिचा आलेख सावरण्यासाठी हा फोन मदत करू शकेल, अशी खात्री कंपनीला वाटतेय.
या स्मार्टफोनची 2500 एमएएचची बॅटरी 15 तासांचा टॉकटाम देते. तसंच स्टॅन्डबाय 16.2 दिवसांपर्यंत हा फोन सुरू राहू शकतो. हा स्मार्टफोन केवळ काळ्या रंगात उपलब्ध आहे.
या स्मार्टफोनची विक्री 2 जुलैपासून सुरू होणार आहे. हा फोन मोबाईल स्टोअर, फ्लिपकार्ट आणि ब्लॅकबेरीच्या खास दुकानांत उपलब्ध असेल. फ्लिपकार्ट प्री बुकिंगवर 1,000 रुपयांचं फ्री वाऊचरही देणार आहे.
Z3 चे काही फिचर्स…
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.