मुंबई : तुम्ही केवळ १० वी पास आहात आणि तुम्ही विचार करत असाल की आपल्या सरकारी नोकरी कशी मिळेल, तर तुमचा शोध संपला आहे. सब स्टाफ कॅडर अंतर्गत बँक ऑफ इंडियामध्ये शिपाईच्या रिक्त पदांसाठी जाहिरात जारी करण्यात आली. आहे. अर्ज करण्यासाठी आपल्या दहावी पास होणे आवश्यक आहे.
पात्रता : या पदासाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही मान्यता प्राप्त शिक्षण मंडळाची १० वी पासचे प्रमाणपत्र हवे. तसेच हिंदी/मराठी आणि इंग्रजीत कार्य करता आले पाहिजे.
वयोमर्यादा : या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची किमान वयोमर्यादा १८ वर्ष आणि कमाल मर्यादा २६ वर्ष असली पाहिजे.
निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे करण्यात येणार आहे.
कसा करणार अर्ज : या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने ठराविक स्वरूपात अर्ज करून स्पीड पोस्ट / रजिस्टर पोस्ट / कुरियरवरून पोस्ट बॉक्स क्रमांक ८७, अलिबाग जीपीओ, अलिबाग – ४०२२०१ वर पाठवा.
अर्ज भरण्याची अंतिम तारीख : अर्ज करण्याची अंतिम तारीख १३ डिसेंबर आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.