www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
माळशेज घाटात पुन्हा दरड कोसळली आहे. कालच ८ दिवसांनंतर घाटातून एकेरी वाहतूक सुरू झाली होती. मात्र आज पुन्हा दरड कोसळल्यानं वाहतूक बंद झालीय. या ठिकाणी शनिवार, रविवार कोणीही फिरायला येऊ नका, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
कल्याण-अहमदनगर महामार्गावरील माळशेज घाटातील वाहतूक काल आठ दिवसानंतर सुरू करण्यात आली होती. काहीप्रणात दरड हटविण्यात राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाला यश आले होते. त्यानंतर ही वाहतूक सुरू केली. मात्र, हा घाट धोकादायक स्थितीत असताना वाहतूक का सुरू करण्यात आली, असा प्रश्न उपस्थित होत होता. दरम्यान, आज पुन्हा मोठी दरड रस्त्यावर आल्याने हा घाट वाहतुकीला पूर्णपणे बंद करण्यात आला.
जुलै महिन्यात बुधावारी पडलेली दरड बाजुला करण्यास महामार्ग बांधकाम प्रशासनाला आठ दिवस लागले. आता पुन्हा दरड कोसळल्याने ती बाजुला किती दिवस लागलीत याची माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे या घाटमार्गे वाहतूक करू नका, असा सल्ला देण्यात आला आहे. पर्यटकांनी शनिवार आणि रविवार या दिवशी येथे येणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.