युवराज आज हेजल किचसोबत विवाहबंधनात अडकणार

भारताचा धडाकेबाज ऑलराऊंडर खेळाडू युवराज सिंग आजपासून आपली नवी इनिंग सुरु करणार आहे. मॉडेल आणि अभिनेत्री हेजल किचसोबत तो आज विवाहबंधनात अडकणार आहे.

Updated: Nov 30, 2016, 12:23 PM IST
युवराज आज हेजल किचसोबत विवाहबंधनात अडकणार  title=

नवी दिल्ली : भारताचा धडाकेबाज ऑलराऊंडर खेळाडू युवराज सिंग आजपासून आपली नवी इनिंग सुरु करणार आहे. मॉडेल आणि अभिनेत्री हेजल किचसोबत तो आज विवाहबंधनात अडकणार आहे.

पंजाबच्या फतेग़ढ साहिब या शहरात दोघांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. युवराज, हेजलच्या लग्नाला भारतीय क्रिकेट टीमसोबत सर्वच क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहे.

नुकतीच युवराज सिंगनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्वतः जाऊन लग्नाचं निमंत्रण पत्रिका दिली होती. युवराज, हेजलचे बी टाऊनमधली जवळची मित्रमंडळीही या विवाह सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.