धोनीची मुलगी 'जिवा'चा पहिला व्हिडिओ वायरल

टीम इंडियाचा कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनीची पत्नी साक्षीनं गुरूवारी आपल्या मुलीचा जिवाचा व्हिडिओ सोशल नेटवर्किंग साइट ट्विटरवर पोस्ट केला. पहिल्यांदाच धोनीच्या मुलीचा व्हिडिओ शेअर करण्यात आल्यानं सोशल मीडियावर तो चांगलाच वायरल झालाय.

Updated: Aug 17, 2015, 03:55 PM IST
धोनीची मुलगी 'जिवा'चा पहिला व्हिडिओ वायरल title=

मुंबई: टीम इंडियाचा कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनीची पत्नी साक्षीनं गुरूवारी आपल्या मुलीचा जिवाचा व्हिडिओ सोशल नेटवर्किंग साइट ट्विटरवर पोस्ट केला. पहिल्यांदाच धोनीच्या मुलीचा व्हिडिओ शेअर करण्यात आल्यानं सोशल मीडियावर तो चांगलाच वायरल झालाय.

या व्हिडिओमध्ये जिवा लॅपटॉपवर एक लोकप्रिय गीत- 'हिट द क्वॅन' ऐकतेय. एका दुसऱ्या पोस्टमध्ये साक्षीनं जिवाचा व्हिडिओ टाकण्यासोबतच बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहला मुलगी जिवाकडून एक आव्हान दिलंय. याचं कारण काही तिनं सांगितलं नाही. मात्र साक्षीनं लिहिलंय, #HitTheQuanChallenge#Ziva challenges @RanveerOfficial'

हा व्हिडिओ आतापर्यंत असंख्य जणांनी लाइक केलाय. धोनीची मुलगी जिवा लोकांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. साक्षी आणि धोनी नेहमीच आपल्या मुलीचे फोटो शेअर करत असतात. मात्र पहिल्यांदा व्हिडिओ त्यांनी टाकलाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.