क्रिकेटचा 'गब्बर' कमबॅक कधी करणार?

टीम इंडियाचा ओपनिंग बॅट्समन शिखर धवन सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. यामुळेच आगामी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये त्याला संधी द्यावी की नाही यावरुन क्रिकेटफॅन्समध्ये वाद सुरु झालाय. दरम्यान, काही माजी क्रिकटपटूंच्या मते अशा प्रसंगी धवनला पाठिंब्याची गरज असून त्याचा आत्मविश्वास उंचावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 

Updated: Jan 23, 2015, 10:06 PM IST
क्रिकेटचा 'गब्बर' कमबॅक कधी करणार? title=

मुंबई : टीम इंडियाचा ओपनिंग बॅट्समन शिखर धवन सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. यामुळेच आगामी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये त्याला संधी द्यावी की नाही यावरुन क्रिकेटफॅन्समध्ये वाद सुरु झालाय. दरम्यान, काही माजी क्रिकटपटूंच्या मते अशा प्रसंगी धवनला पाठिंब्याची गरज असून त्याचा आत्मविश्वास उंचावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 
  
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सध्या शिखर धवन खराब फॉर्ममधून जात आहे. मात्र, तरीही वर्ल्ड कपसाठी त्याला टीममध्ये स्थान देण्यात आलं आणि मुरली विजयला अतिरिक्त ओपनर्स म्हणून टीममध्ये स्थान देण्यात आलेलं नाही. यामुळे क्रिकेटवर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती. दरम्यान, धवनला अजूनही सूर गवसलेला नाही. टेस्ट सीरिजनंतर वन-डे सीरिजमध्येही त्याला आपली चमक दाखवता आलेली नाही. 

टेस्ट सीरिजमधील पहिल्या टेस्टमध्ये तो 25 आणि 9 रन्स करु शकला. दुसऱ्या टेस्टमध्ये त्याने 24 आणि 81 रन्सची इनिंग साकारली. तिसऱ्या टेस्टमध्ये 28 रन्स तर दुसऱ्या इनिंगमध्ये तो खातंही उघडू शकला नाही. त्याची ही कामगिरी पाहता त्याला चौथ्या टेस्टमध्ये स्थान देण्यात आलं नाही. 

एव्हढंच नव्हे तर, प्रॅक्टीस मॅचमध्येही तो फ्लॉप ठरला. तो मर्यादीत ओव्हर्सच्या क्रिकेटसाठी अधिक फिट बसत असल्याने तो वन-डे सीरिजमध्ये कमबॅक करेल, अशी आशा त्याच्या फॅन्सला होती. मात्र वन-डे सीरिजमध्येही त्याला खराब फॉर्म सुरुच आहे.

वन-डे सीरिजमध्ये आत्तापर्यंत झालेल्या पहिल्या दोन्ही वन-डेमध्ये धवन अनुक्रमे 2 आणि एकच रन्स करु शकलाय. यामुळे अखेरच्या वन-डेमध्ये आपल्याला संधी मिळते का की अखेरच्या टेस्टप्रमाणे वन-डेलाही मुकावं लागणार? याची चिंता खुद्द धवनलाही भेडसावत असणार.

दरम्यान काही माजी क्रिकेटपटूंच्या मते वर्ल्ड कप अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला असताना आणि टीममधील एखादा खेळाडू बॅड पॅचमधून जात असताना त्याचं मनौधर्य उंचावणं आणि त्याचा फॉर्म कसा सुधारेल यावर साऱ्यांनी लक्ष केंद्रीत करायला पाहिजे. भारताचे माजी ओपनर आणि कोच लालचंद रजपूत यांच्या मध्ये कोच आणि टीम डायरेक्टर रवी शास्त्री यांनी धवनला ऑत्मविश्वास द्यायला पाहिजे. तो आता वर्ल्ड कप खेळणार आहे अशाप्रसंगी धवनला पाठिंब्याची गरज आहे. विशेषत: जेव्हा एखादा खेळाडू रन्स करत नसेल तेव्हा त्याला पाठिंब्याची अधिक गरज असते.
 
तर दिल्ली रणजी टीमचे कोच विजय दहिया यांच्या मते धवनला जर मोठी खेळी करता येत नसेल तर त्याने किमान 40-50 रन्स करण्यावर लक्ष केंद्रीत करायला पाहिजे. त्याने नेहमीच मोठ्या इनिंग खेळल्या आहेत. यामुळे त्याचं टार्गेट अधिक असत. मात्र सध्याच्या घडीला त्याने मोठ्या इनिंगऐवजी किमान रन्स उभारण्याचं टार्गेट ठेवलं पाहिजे.

धवनने हा सल्ला मानला तर कदाचित त्याला सूर सापडेल. मात्र, वर्ल्ड कपसारख्या महत्त्वाची टूर्नामेंट अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली असताना टीमच्या ओपनरबाबतच जर अशी संभ्रमाची स्थिती असेल तर कोणत्याही टीमसाठी ही बाब नक्कीच चांगली नाही.
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.