अर्जुन सचिन तेंडुलकरची युवीप्रमाणे धुवाँधार बॅटींग, ठोकले शतक

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा १६ वर्षीय मुलगा अर्जुनने युवराज सिंग प्रमाणे धडाकेबाज खेळी करत शतक ठोकले. त्यांने १०६ रन्स केल्यात.

Updated: Nov 25, 2015, 03:32 PM IST
अर्जुन सचिन तेंडुलकरची युवीप्रमाणे धुवाँधार बॅटींग, ठोकले शतक  title=

 मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा १६ वर्षीय मुलगा अर्जुनने युवराज सिंग प्रमाणे धडाकेबाज खेळी करत शतक ठोकले. त्याने १०६ रन्स केल्यात.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या ज्युनिअर्स क्रिकेट टुर्नामेंटमध्ये चांगली खेळी करत शानदार शतक झळकावले. अर्जुनने एकून २१८ रन्स काढलेत.

रोहित शर्मा इलेव्हन विरुद्ध सुनील गावसकर इलेव्हन यांच्यात मुंबई क्रिकेट असोसिएशनची अंडर-१६ परोडे ट्रॉफी मंगळवारी खेळविण्यात आली. टीममध्ये ही टुर्नामेंट खेळविण्यात येत आहे. या टुर्नामेंटमधील शेवटचा सामना होता. तर अन्य दोन टीम सचिन तेंडुलकर आणि  दिलीप वेंगसरकर इलेव्हन आहेत. सुनील गावसकर इलेव्हनकडून अर्जुन खेळत आहे. या आधी अर्जुनने ४२ बॉलमध्ये तुफानी फटकेबाजी करत ११८ रन्स केल्या होत्या.

दरम्यान, सचिनने १६ वर्षी भारतासाठी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. सचिनच्या निवृत्तीनंतर आता सचिन चाहत्यांची अर्जुनकडून मोठी अपेक्षा आहे.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.