मुंबई : मुंबई इंडियन्स विरूद्ध वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात किंग्ज इलेवन पंजाबच्या मार्टिन गुप्टील याने सुपरमॅन अंदाजात कॅच पकडला. असा कॅच पकडणे खूप अवघड असते. पण मार्टिनने हा कॅट पकडून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.
मुंबई विरूद्ध डावाचे दहावे षटक होते. त्यात कर्णधार ग्ले मॅक्सवेल गोलंदाजी करत होता. सलामी फलंदाज लिंडल सिमन्स ५९ धावांवर खळत होता. त्याने या षटकातील तिसरा चेंडू बॉन्ड्री बाहेर मारण्याचा प्रयत्न केला. हा चेंडू बॉन्ड्री बाहेर जाईल असे सर्वांना वाटत होते पण गुप्टीलने उंच उडी घेऊन एका हाताने कॅच पकडला.
हा कॅच आयपीएलमधील सर्वात चांगल्या कॅचमध्ये सामील झाला आहे.
https://t.co/tLs6PWGEfk #VIVOIPL via @ipl
— Cricket-atti (@cricketatti) May 11, 2017