मार्लन सॅम्युअल्सला व्हायचंय पाकिस्तानी लष्करात भरती

वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू मार्लन सॅम्युअल्सनं पाकिस्तानी लष्करात भरती व्हायची इच्छा व्यक्त केली आहे.

Updated: Mar 13, 2017, 08:01 PM IST
मार्लन सॅम्युअल्सला व्हायचंय पाकिस्तानी लष्करात भरती

लाहोर : वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू मार्लन सॅम्युअल्सनं पाकिस्तानी लष्करात भरती व्हायची इच्छा व्यक्त केली आहे. पाकिस्तानी सुपर लीग या टी20 स्पर्धेमध्ये सुरक्षेचं कारण देत अनेक क्रिकेटपटूंनी सहभाग घेण्यास नकार दिला, पण सॅम्युअल्स या स्पर्धेत सहभागी झाला.

सॅम्युअल्स हा पेशावर जाल्मी या संघाकडून खेळतो. लाहोरमध्ये झालेल्या फायनल मॅचवेळी लष्करप्रमुख जनरल कामर जावेद बाजवा यांनी टीमची भेट घेतली. या भेटीवेळी सॅम्युअल्सनं इथल्या सुरक्षा व्यवस्थेचं कौतुक केलं आणि पाकिस्तानी लष्करात भरती व्हायची इच्छा बोलून दाखवली. पेशावरच्या टीमचे मालक जावेद आफ्रिदींनी सॅम्युअल्सचा हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.