मेसी 'गोल्डन बॉल' तर नोया 'गोल्डन ग्लोव्ह'चा मानकरी

अर्जेन्टाईन टीमला वर्ल्ड कपच्या फायनल मॅचमध्ये जर्मनीकडून 1-0 नं पराभव स्वीकारावा लागला. मात्र, असं असलं तरी, अर्जेन्टाईन कॅप्टन लिओनेल मेसीला या वर्ल्ड कपच्या ‘प्लेअर ऑफ द टुर्नामेंट’ खिताबानं गौरवण्यात आलं. 

PTI | Updated: Jul 14, 2014, 08:47 AM IST
मेसी 'गोल्डन बॉल' तर नोया 'गोल्डन ग्लोव्ह'चा मानकरी title=

रिओ दी जनैरो: अर्जेन्टाईन टीमला वर्ल्ड कपच्या फायनल मॅचमध्ये जर्मनीकडून 1-0 नं पराभव स्वीकारावा लागला. मात्र, असं असलं तरी, अर्जेन्टाईन कॅप्टन लिओनेल मेसीला या वर्ल्ड कपच्या ‘प्लेअर ऑफ द टुर्नामेंट’ खिताबानं गौरवण्यात आलं. 

मेसीनं या वर्ल्ड कपमध्ये चार गोल झळकावले. या वर्ल्ड कपमध्ये त्याचीच सर्वोत्तम फुटबॉलर म्हणून अखेर निवड झाली. मेसी हॅमेज रॉड्रीगेज, जर्मनीचा थॉमस मुलर आणि नेमार या तिघांना मागे टाकत गोल्डन बॉलचा मानकरी ठरला. 
 
कोलम्बियाचा स्टार फुटबॉलर हॅमेज रॉड्रीगेज यावर्ल्ड कपचा खऱ्या अर्थानं सरप्राईज पॅकेज ठरला. कोलम्बियाच्या या 22 वर्षीय फुटबॉलपटूनं वर्ल्ड कपमध्ये तब्बल सहा गोल झळकावण्याची किमया साधली. आपल्या डेब्यू वर्ल्ड कपमध्येच त्यानं सर्वोत्तम खेळ करत साऱ्यांचच लक्ष वेधून घेतलं. या वर्ल्ड कपमध्ये दन दना दन साहा गोल झळकावल्यामुळे त्याला गोल्डन बूटच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. 

या फुटबॉल वर्ल्ड तपचा रॉड्रीगेज फाईंड ठरलाय. न्यू फुटबॉल स्टार इज बॉर्न असं त्यानं या वर्ल्ड कपमध्ये साऱ्यांनाच दाखवून दिलंय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.