लीड्स: भारताचा माजी क्रिकेटपटू कपिल देवचं टेस्ट क्रिकेटमधलं 434 विकेटचं रेकॉर्ड तुटलं आहे. श्रीलंकेविरुद्ध लीड्समध्ये सुरु असलेल्या टेस्टमध्ये इंग्लंडच्या जेम्स अंडरसननं हे रेकॉर्ड तोडलं आहे. श्रीलंकेच्या अॅंजेलो मॅथ्यूजची विकेट घेऊन अंडरसननं टेस्ट क्रिकेटमध्ये आपल्या 435 विकेट पूर्ण केल्या.
यामुळे टेस्ट क्रिकेटमध्ये आता सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीमध्ये अंडरसन सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. या यादीमध्ये 800 विकेट्स घेणारा श्रीलंकेचा मुथैय्या मुरलीधरन पहिल्या क्रमांकावर आहे. तर शेन वॉर्नच्या नावावर 708 विकेट, अनिल कुंबळेच्या नावावर 619 विकेट, ग्लेन मॅकग्राथच्या नावावर 563 विकेट, कोर्टनी वॉल्शच्या नावावर 519 विकेट आहेत.