फ्लोरि़डा : वेस्ट इंडिजविरुद्धची दुसरी टी-20 मॅट पावसामुळे रद्द झाली. ही मॅच रद्द झाल्यामुळे भारतानं दोन टी-20ची ही सीरिज 1-0नं गमावली आहे. 144 रनचा पाठलाग करत असताना भारतानं 2 ओव्हरमध्ये एकही विकेट न गमावता 15 रन केल्या होत्या, पण यानंतर 15 मिनीटं जोरदार पाऊस पडला आणि मॅच रद्द करण्यात आली.
मॅच रद्द करण्याच्या या निर्णयामुळे धोनी नाराज झाला आहे. पाऊस थांबल्यानंतर मैदानाची पहाणी करण्यात आली, तेव्हा मैदान खेळण्यासाठी सुरक्षित नसल्याचं मत वेस्ट इंडिजचा कॅप्टन कार्लोस ब्रॅथवेटनं व्यक्त केलं. ब्रॅथवेटच्या या मतानं मॅच रद्द करण्याच्या निर्णयावर प्रभाव पडला.
ब्रॅथवेटच्या या मतावर धोनीनं आक्षेप घेतला आहे. मागच्या 10 वर्षांमध्ये यापेक्षा वाईट मैदानांवर मी खेळलो असल्याचं धोनी म्हणाला आहे. या सीरिजमध्ये वेस्ट इंडिज 1-0नं पुढे होतं आणि दुसरी मॅच वेस्ट इंडिजच्या हातातून निसटून जात असल्यामुळे ब्रॅथवेटनं मैदानाबाबत आक्षेप घेतले का असा प्रश्नही यामुळे उपस्थित होतं आहे.