काय घडलं होतं ‘त्या’ रात्री, सांगतोय अँन्ड्र्यू फ्लिंटॉफ

इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू अँन्ड्र्यू फ्लिंटॉफ २००७ साली वर्ल्डकप दरम्यान वेस्ट इंडीजच्या समुद्र किनाऱ्यावर बेशुद्ध अवस्थेत आढळला होता. या प्रकरणी त्याच्यावर खूप टीकाही झाली होती तसंच त्याला एका मॅचसाठी निलंबितही करण्यात आलं होतं. त्याच्यावर तेव्हा ही परिस्थिती का ओढावली होती, या प्रश्नाचं उत्तर फ्लिंटॉफनं आत्ता कथन केलंय.

Updated: Sep 13, 2014, 01:57 PM IST
काय घडलं होतं ‘त्या’ रात्री, सांगतोय अँन्ड्र्यू फ्लिंटॉफ title=

लंडन : इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू अँन्ड्र्यू फ्लिंटॉफ २००७ साली वर्ल्डकप दरम्यान वेस्ट इंडीजच्या समुद्र किनाऱ्यावर बेशुद्ध अवस्थेत आढळला होता. या प्रकरणी त्याच्यावर खूप टीकाही झाली होती तसंच त्याला एका मॅचसाठी निलंबितही करण्यात आलं होतं. त्याच्यावर तेव्हा ही परिस्थिती का ओढावली होती, या प्रश्नाचं उत्तर फ्लिंटॉफनं आत्ता कथन केलंय.

‘आय टीव्ही’ला दिलेल्या एका मुलाखतीत फ्लिंटॉफनं माजी स्टार क्रिकेटर इयान बॉथमसोबत घालवलेल्या त्या रात्रीच्या आठवणींना उजाळा दिलाय. 
 
इयानसोबत ड्रिंक्स करण्यासाठी त्या दिवशी अँन्ड्र्यूनं ठरवलं होतं. तो म्हणतो, ‘मला माहीत होतं की समुद्र किनाऱ्यावर छोट्या होड्या असतील आणि मला हेही ठाऊक होतं की बॉथम एका नावेवर होता. मी ठरवलं की रात्री उशीरा त्याच्यासोबत ड्रिंक्सची मजा घेऊया... पण, मला पोहता येत नव्हतं... त्यामुळे, माझ्यासाठी तिथं जाणं धोकादायक होतं. म्हणून मी छोटी होडी शोधत होतो. मला चप्पू मिळाले नाही तेव्हा मी एक छोटी होडी पाण्यात तशीच उतरवली... दुसऱ्या दिवशी मी उठलो तेव्हा माझ्या बेडवर होतो...’ 

त्याचं झालं असं की, होडीला पाण्यात ढकलल्यानंतर तो नशेत असल्यामुळे होडी पुढे नेऊ शकला नाही. काही जणांनी मदत केल्यानंतर त्याला तिथून बाहेर काढण्यात आलं अन्यथा त्याला आजचा दिवसही दिसू शकला नसता. 

फ्लिंटॉफ सांगतो, ‘दुसऱ्या दिवशी माझे डोळे उघडले तेव्हा मी माझ्या बेडवर होतो. पूर्ण कपडे ओले होते... पायांना वाळू होती... तेव्हाच दरवाजावर टक टक झालं... मला वाटलं की कुणीतरी सफाई करणारं असेल... म्हणून मी त्याला नंतर येशील का? असं विचारलं... पण, तो सफाई कामगार नव्हता तर ते टीम कोच डंकन फ्लेचर होते’ 

या घटनेनंतर फ्लिंटॉफला एका मॅचसाठी निलंबित करण्यात आलं तसंच त्याला उप-कॅप्टनपदावरूनही पायउतार व्हावं लागलं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.