अॅडीलेड : ऑस्ट्रेलिया विरूद्ध पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅचमध्ये पदार्पण करणाऱ्या हार्दिक पांड्याच्या कामगिरीने भारतीय कर्णधार प्रभावित झाला आहे. प्रत्येक युवा खेळाडू अशी कामगिरी करेल तर टीमला स्थिरता मिळेल.
ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजी भारतीय गोलंदाजांना टार्गेट केले तेव्हा पांड्याने चांगले यॉर्कर फेकले आणि सुरूवात धुलाई झाल्यानंतर त्याने ३७ धावा देऊन दोन विकेट घेतल्या.
धोनीने मॅचनंतर सांगितले की, आम्ही चांगली गोलंदाजी केली. पहिले षटक टाकल्यानंतर पांड्याने खूप चांगली गोलंदाजी केली. तो खूप चांगल यॉर्कर टाकत होता. तसेच वाइड चेंडू चांगल्या पद्धतीने टाकत होता. एकूण चांगला प्रयत्न होता. मला वाटते की तो आम्हांला स्थिरता देऊ शकतो. आम्हांला याचीच गरज आहे.
धोनीला जेव्हा विचारण्यात आले, की भारताच्या विजयाचे एका पेक्षा अधिक कारण असल्याने तू खूष आहे. त्यावर धोनी म्हणाला. ही मॅच खूप चांगली होती. चांगले वाटले की आम्ही फलंदाजांना मोठे शॉट खेळण्यास भाग पाडत होता. रोहितन चांगली सुरूवात केली. त्यानंतर विराट आणि रैना चांगले खेळले. आशीषने चांगले काम केले. हे नेहमी महत्त्वाच असते की तुम्ही टीम म्हणून विजयी झालात.
रैनाने चांगली फलंदाजी केली. त्याने आणि युवीने केवळ एका नेट सेशनला हजेरी लावली होती. त्यामुळे मी युवराजच्या अगोदर खेळायला आलो.