‘बिग बॉस’मध्ये अटक, अरमान कोहली घरातून थेट तुरुंगात

रिअॅलिटी शो ‘बिग बॉस सीझन-७’मध्ये आता चांगलाच वादात सापडलाय. आरोप-प्रत्यारोपानंतर आता बिग बॉसच्या घरात अटक झालीय. अभिनेता अरमान कोहली याला लोणावळा पोलिसांनी अटक केलीय. बिग बॉसच्याच घरात असलेली सदस्य सोफिया हयातनं तिला अरमाननं मारहाण केल्याची तक्रार केली होती.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Dec 16, 2013, 11:35 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, लोणावळा
रिअॅलिटी शो ‘बिग बॉस सीझन-७’मध्ये आता चांगलाच वादात सापडलाय. आरोप-प्रत्यारोपानंतर आता बिग बॉसच्या घरात अटक झालीय. अभिनेता अरमान कोहली याला लोणावळा पोलिसांनी अटक केलीय. बिग बॉसच्याच घरात असलेली सदस्य सोफिया हयातनं तिला अरमाननं मारहाण केल्याची तक्रार केली होती.
बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेली ब्रिटिश-पाकिस्तानी मॉडल सोफिया हयात हिनं अरमानबरोबर झालेल्या भांडणाची मुंबईमधल्या सांताक्रुज पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार नोंदवली होती. या तक्रारीत तिनं अरमानवर मारामारी, शिविगाळ आणि बेसीस्तपणाचा गुन्हा नोंदविला आहे.
सोफियानं सांगितल्याप्रमाणं ही घटना ४ डिसेंबरला घडली. त्या शोचा काही हिस्सा हा बिग बॉसच्या शोमध्ये दाखवण्यात आला होता. परंतु काही भाग प्रसारीत करण्यात आला नव्हता. बिग बॉसचा स्टुडियो लोणावळ्यात असल्यामुळे सांताक्रुज पोलिसांनी ही तक्रार लोणावळा पोलीस स्टेशनला ट्रान्सफर केली होती. त्यामुळं पुन्हा बिग बॉसच घर हे वादाच्या भवऱ्यात सापडलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.