बेसन लाडू

साहित्य – २ वाट्या बेसनाचं पीठ, १ वाटी पिठी साखर, पाव वाटी दूध, १/२ वाटी तूप, १/२ चमचा वेलची पावडर, ५० ग्रॅम बेदाणे, ५० ग्रॅम काजू .

Updated: Oct 22, 2012, 05:06 PM IST

www.24taas.com, मुंबई
साहित्य –
२ वाट्या बेसनाचं पीठ, १ वाटी पिठी साखर, पाव वाटी दूध, १/२ वाटी तूप, १/२ चमचा वेलची पावडर, ५० ग्रॅम बेदाणे, ५० ग्रॅम काजू.

कृती –
गॅसवर कढई ठेवून त्यात तूप वितळू दयावे. मग त्यात बेसन घालावे. ढवळत राहावे, कढईला तळाशी करपणार नाही ह्याची काळजी घ्यावी. चांगले खमंग होइपर्यन्त भाजावे. सुगंध दरवळला व रंग गुलाबी झाला कि गॅस बन्द करावा. भांडे खाली उतरवुन घ्यावे. त्यात दुध घालावे. परत ढवळावे. वरील मिश्रण थंड झाले कि त्यात पिठी साखर आणि वेलची पावडर घालावी. हाताने चांगले एकत्र करावे. आणि लाडु वळायला घ्यावे. लाडू वळताना मध्ये एक-एक बेदाणा तसेच काजू लाऊन लाडूची सजावट करावी.