युएस ओपन फायनलमध्ये जोकोविच-अँडी मरे

डिफेंडिंग चॅम्पियन नोवाक जोकोविचने फोर्थ सीडेड स्पॅनिआर्ड टेनिस प्लेअर डेव्हिड फेररचा 2-6, 6-1, 6-4, 6-2ने पराभव करत दिमाखात तिस-यांदा फायनल गाठली.पावसाने धुमाकूळ घातलेल्या युएस ओपन फायनलमध्ये जोकोविचसमोर आव्हान असणार आहे ते लंडन ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकणा-या अँडी मरेचं.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 10, 2012, 01:28 PM IST

www.24taas.com,नवी दिल्ली
डिफेंडिंग चॅम्पियन नोवाक जोकोविचने फोर्थ सीडेड स्पॅनिआर्ड टेनिस प्लेअर डेव्हिड फेररचा 2-6, 6-1, 6-4, 6-2ने पराभव करत दिमाखात तिस-यांदा फायनल गाठली.पावसाने धुमाकूळ घातलेल्या युएस ओपन फायनलमध्ये जोकोविचसमोर आव्हान असणार आहे ते लंडन ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकणा-या अँडी मरेचं.
पावसाच्या सावटाखाली सुरू झालेल्या मेन्स सेकंड सेमीफायनलमध्ये सेकंड सीडेड सर्बियन नोवाक जोकोविचने स्पॅनिश टेनिस प्लेअर डेव्हिड फेररचा पराभव करत दिमाखात तिस-यांदा युएस ओपनची फायनल गाठली. डिफेंडिंग चॅम्पियन असणा-या जोकोविचने फेररचं आव्हान चार सेट्समध्ये 2-6, 6-1, 6-4, 6-2ने मोडित काढलं.
आदल्या दिवशी पावसामुळे खेळ थांबवण्यात आला तेव्हा फेरर पहिल्या सेटमध्ये 5-2ने आघाडीवर होता. मात्र रविवारी कन्टिन्यू करण्यात आलेल्या मॅचमध्ये जोकोविचने आपली कमाल दाखवत फेररला संधीच दिली नाही. आणि फेररचा पराभव करताना या वर्षाच्या 60व्या विजयाची नोंद केली... हार्डकोर्टवरील जोकोविचचा हा सलग 27वा विजय ठरला. फेररविरूद्ध झालेल्या सेमीफायनलपूर्वी जोकोविचने युएस ओपनमध्ये आतापर्यंत एकही सेट गमावला नव्हता.
पहिला सेट गमावल्यानंतर जोकोविचने पिछाडी भरून काढत सेकंड सेटमध्ये 5-0ने आघाडी घेतली. तसंच तीन ब्रेक पॉईंट्सही वाचवले...करिअरमध्ये दुस-यांदा सेमीफायनल गाठणा-या फेररचा पहिला सेट वगळता इतर सेट्समध्ये माजी वर्ल्ड चॅम्पियन असणा-या जोकोविचसमोर निभाव लागला नाही. तिस-या सेटमध्ये जोकोविचने फेररची सर्व्हिस ब्रेक करत फेररच्या आव्हानातली हवाच काढून टाकली.
बेसलाईनवर खेळ करणा-या जोकोविचने चौथ्या सेटमध्ये पुन्हा फेररची सर्व्हिस दोनदा भेदत फेररला पुरतं नामोहरम केलं. आणि अखेर जोकोविचने फोरहॅण्डच्या जोरावर सेमीफायनल खिशात घालत. दिमाखात फायनलमध्ये प्रवेश मिळवला. युएस ओपनच्या फायनलमध्ये ब्रिटीश प्लेअर अँडी मरेविरूद्ध खेळताना जोकोविचचं लक्षं असणार आहे ते सहावं ग्रँड स्लॅम जेतेपदाचं. तर 1936 मध्ये फ्रेड पेरी नंतर मेन्स सिंगल्सचं ग्रँड स्लॅम पटकावणारा दुसरा ब्रिटिश टेनिस प्लेअर बनण्याचं आव्हान अँडी मरे समोर असणार आहे.