मुंबई : मुंबईकरांचं अराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायकाचं दर्शन 5 दिवस घेता येणार नाही.18 जानेवारी ते 22 जानेवारी दरम्यान सिद्धिविनायक दर्शन भाविकांसाठी बंद असणार आहे.
या काळात सिद्धिविनायकाच्या मुर्तीला शेंदुरलेपन करण्यात येणार असून भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी श्रींची प्रती मुर्ती दर्शनासाठी मंदिर आवारात ठेवण्यात येणार आहे.
23 जानेवारीला दुपारी 1 नंतर श्रीच्या मुर्तीचं दर्शन भाविकांना घेता येणार आहे. वर्षातून एकदा मूर्तीचे शेंदूरलेपन करण्यात येतं. 31 जानेवारीला माघी गणेशोत्सव सुरू होतोय. तत्पुर्वी हे शेंदूरलेपन केलं जातं.