अबब... सेट टॉप बॉक्सच्या किंमती वाढल्या

केबलधारकांसाठी सेट टॉप बॉक्स देशभरात अनिवार्य केल्यानंतर त्याच्या किमतीत गेल्या ८ दिवसांत दुपटीने वाढ झाली आहे.

Updated: Apr 3, 2013, 05:54 PM IST

www.24taas.com, मुंबई
केबलधारकांसाठी सेट टॉप बॉक्स देशभरात अनिवार्य केल्यानंतर त्याच्या किमतीत गेल्या ८ दिवसांत दुपटीने वाढ झाली आहे. गेल्या महिन्यांत एक हजार ते बाराशे रूपयांना मिळणार्‍या सेट टॉप बॉक्ससाठी ग्राहकांना आता २ हजार रूपये मोजावे लागत असल्याचे चित्र आहे.
देशातील ४ महानगरांमध्ये सुरवातीला सेट टॉप बॉक्सची सक्ती करण्यात आली होती. त्यामुळे पुण्यात सेट टॉप बॉक्स बसविण्यास नागरिकांनी सुरूवात केली होती. तेव्हा साधारणत: साडेसातशे ते आठशे रूपयांना बॉक्स मिळत होता. मात्र, त्यास अल्प प्रतिसाद होता. ३१ मार्च डेडलाईन जसजशी जवळ येऊ लागली तसतशी सेट टॉप बॉक्सची मागणी वाढत असल्याचे चित्र शहरात होते. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी डीटीएच कंपन्यांनी डिस्काऊंटही देणे सुरू केले होते.
केबल व्यावसायिकही ग्राहकांना बॉक्स बसवून देत होते. यासाठी ते आठशे ते बाराशे रूपये प्रत्येक सेट टॉप बॉक्ससाठी आकारत होते. काही केबल व्यावसायिकांनी तर ग्राहकांना मोफत सेट टॉप बॉक्स लावून दिले.