[field_breaking_news_title_url]
www.24taas.com, मुंबई
स्टँप पेपर आता हद्दपार होणार आहे. याबाबत राज्य सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. यानुसार एवढे दिवस व्यावहारिक कामांसाठी गरजेचा असणारा स्टँप पेपर आता कालबाह्य होणार आहे.
स्टँप ड्युटीची रक्कम आता थेट बँकेत जाऊन भरावी लागणार आहे. बनावट स्टॅम्प पेपर आणि त्यामुळे होणारे वाढते गैरव्यवहार रोखण्यासाठी सरकारने हे पाऊल उचललं आहे. बनावट स्टँप पेपरमुळे अनेक मोठे घोटाळेही उघडकीस आले होते.
त्यामुळे आता स्टॅम्पपेपरच हद्दपार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य़ मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.