मुंबई मरोळमध्ये पूल कोसळला, तिघांचा मृत्यू...

मुंबईत बांधकाम सुरु असलेल्या ओव्हरब्रीजचा भाग कोसळून तिघांचा मृत्यू झालाय.. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ ही घटना घडलीय..

Updated: Feb 7, 2013, 08:25 AM IST

www.24taas.com, मुंबई
मुंबईत बांधकाम सुरु असलेल्या ओव्हरब्रीजचा भाग कोसळून तिघांचा मृत्यू झालाय.. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ ही घटना घडलीय...पूलाचा भाग कोसळताच ढिगा-याखाली अडकून तीन मजुरांचा जागीच मृत्यू झालाय.. तर 8 जण गंभीर जखमी झालेत.. शिवाय एक जण बेपत्ता असून तो ढिगा-याखाली अडकल्याची शक्यता वर्तवली जातेय.. बुधवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली...
तीस मीटर लांब ब्रीजचा स्लॅब क्रेनच्या मदतीने दोन पिलरवर ठेवण्यात येत होता.. मात्र संतुलन बिघडल्यानं हा स्लॅब खाली कोसळून ही दुर्दैवी घटना घडली... विमानतळ आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला जोडणा-या ब्रीजचं बांधकाम सुरु आहे.. याआधीसुद्धा अशाप्रकारच्या दोन घटना मुंबईत घडल्यात.. मात्र विमानतळ परिसराचा विकास करणा-या जीव्हीके आणि एल एंड टी कंपनीने यातून कोणताही बोध घेतला नसल्याचा आरोप होतोय..
घटनेनंतर महापौर सुनील प्रभूंनी तात्काळ घटनास्थळाची धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला.. एवढ्या मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरु असताना तिथं एकही एँम्ब्युलन्सची सोय नव्हती... दरम्यान अग्निशमन दलाकडून ढिगारा उपसण्याचं काम अजूनही सुरु आहे..