मुंबई : तेलंगनाच्या शिक्षण विभागाने सहावीचं 'अवर वर्ल्ड थ्रू इंग्लीश' हे पुस्तक प्रकाशित केलंय. या पुस्तकात शिक्षण विभागानं अकलेचे तारे तोडल्याचं समोर येतंय.
'दि लॉस्ट कॅसकेड' या धड्यात जॉन नावाचा व्यक्ती शिवाजी महाराजांचे प्राण वाचवतो, असा उल्लेख करण्यात आलाय. तसंच धड्याच्या शेवटी जॉनने महाराजांचे प्राण वाचवले नसते तर काय झाले असते? जॉन हा महाराजांइतकाच शूर नाही का? तुम्ही जॉनच्या जागी असता तर काय केले असते? असे प्रश्ऩही विचारण्यात आलेत.
हा इतिहास खोटा असून पुस्तकाच्या लेखकावर कायदेशीर कारवाई करणात यावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केलीय.
महाराष्ट्र सरकारने याची दखल घेतली नाही तर उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशराही हिंदू जनजागृती समितीनं दिलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.