www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
एक फॅन, टीव्ही आणि ट्यूब लाईट एवढीच उपकरणं वापरणा-या घरात महिना ५० हजार रूपयांचं बिल आलं तर आपल्याला धडकी भरल्याशिवाय राहणार नाही. मुंबईत खरंच असं घडलंय. गिरणी कामगार असलेल्या श्रीनिवासन यांना गेल्या तीन महिन्यांपासून पन्नास हजार रूपये वीजबील येतंय. या बिलाचा धसका घेतल्यामुळे श्रीनिवासन यांच्या आई अंथरूणाला खिळल्या आहेत.
तब्बल ५५,००० रूपयांचा आकडा असलेलं हे वीजबिल संपूर्ण इमारतीचं नाही. हा आकडा आहे श्रीनिवासन यांना गेल्या तीन महिन्यांपासून येत असलेल्या बिलाचा. सेंच्युरी मिलमध्ये काम कऱणा-या श्रीनिवासन यांना ऑक्टोबर ते डिसेंबर या तीनही महिन्यात ५० हजारावर विजेचं बील आलंय.
श्रीनिवासन यांच्या घरात फक्त एक पंखा, टीव्ही आणि ट्यूब लाईट एवढीच उपकरणं आहेत. तरीही बेस्टच्या लेखी श्रीनिवास हे पन्नास हजारांची वीज वापरतात. वारंवार बेस्टच्या विद्युत पुरवठा विभागाकडे तक्रार केल्यावर त्यांना १५०० रूपये, १०००रूपये आणि ५००रूपयांचा भरणा करण्यास सांगण्यात आलं. त्यानंतर त्यांची कापलेली वीजही सुरू झाली.
झी २४तासने याविषयी बेस्टच्या अध्यक्षांकडे विचारणा केली असता त्यांनी चूक मान्य केलीय. तसंच असा प्रकार पुन्हा होणार नाही, अशी ग्वाही दिलीय. वीज थकबाकीची रक्कम भरण्यासाठी श्रीनिवासन यांना आपल्या पत्नीचं मंगळसूत्रही गहाण ठेवावं लागलं. बेस्टच्या फॉल्टी मीटरमुळे श्रीनिवासन आणि त्य़ांच्या कुटुंबियांना आर्थिक भुर्दंड तर सोसावा लागलाच, पण त्यापेक्षा होत असलेला मानसिक त्रास आणखी जाचक आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
fan, TV & tube light bill only 55 thousand in mumbai
Home Title: 

एक फॅन, टीव्ही आणि ट्यूब लाईट बिल फक्त ५५ हजार

No
165466
No
Authored By: 
Surendra Gangan