...कर्णकर्कश हॉर्ननं त्रास असा शिकवा आता धडा!

रस्त्यावरून जाताना उगाचच कर्णकर्कश हॉर्न वाजवून इतरांना त्रास देणाऱ्या उडानटप्पू वाहन चालकांविरुद्ध आता तुम्ही रितसर तक्रार नोंदवू शकता... यासाठी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनची मदत घ्यावी लागेल.

Updated: Oct 8, 2015, 02:37 PM IST
...कर्णकर्कश हॉर्ननं त्रास असा शिकवा आता धडा! title=

मुंबई : रस्त्यावरून जाताना उगाचच कर्णकर्कश हॉर्न वाजवून इतरांना त्रास देणाऱ्या उडानटप्पू वाहन चालकांविरुद्ध आता तुम्ही रितसर तक्रार नोंदवू शकता... यासाठी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनची मदत घ्यावी लागेल.

यापुढे कर्णकर्कश हॉर्न आणि बेकायदा सायरनची तक्रार तुम्हाला थेट करता येणार आहे. त्यासाठी फक्त हे ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांचा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनच्या साहाय्यानं तयार करावा लागेल. 

यासाठी, राज्याच्या वाहतूक आयुक्त सोनिया सेठी यांनी मुंबई आणि उपनगरांमधल्या आरटीओचे नंबर आणि ईमेल जाहीर केलेत. पुराव्याच्या व्हिडिओसह तक्रार केल्यानंतर योग्य कारवाई करून वाहनामधले प्रदूषण करणारे भोंगे काढून टाकले जातील. यासाठी 2000 रुपयांचा दंडही वसूल केला जाऊ शकतो.

दिलीप नेवतीया यांच्या तक्रारीनंतर हरित लवादानं दिलेल्या आदेशांनुसार वाहतूक विभागानं ही सोय उपलब्ध करुन दिलीय. सामाजिक कार्यकर्त्यांनी या घोषणेचं स्वागत केलंय आणि नागरिकांनी या सुविधेचा वापर करून ध्वनी प्रदुषण करणाऱ्यांना जरब बसवण्याचं आवाहन केलंय. 

या ईमेलवर करा तक्रार दाखल... 
ताडदेव आटीओ - MH01@mahatranscom.in
अंधेरी आरटीओ - MH02@mahatranscom.in
बोरिवली आरटीओ - MH47@mahatranscom.in
वडाळा आरटीओ - MH03@mahatranscom.in

या ईमेलवर तुम्ही तुमची तक्रार ऑडिओ - व्हिडिओ पाठवू शकता.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.