मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून भाडेवाढी विरोधात नियोजित आंदोनल केलं जाणार आहे. आज ठिकठिकाणी रेल्वे स्थानकांवर काँग्रेसकडून हे आंदोलन करण्यात येईल.
भाडेवाढ पूर्ण रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहील असं काँग्रेसकडून सांगण्यात आलंय. रेल्वे भाढेवाढीविरोधात काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतलाय.
27 जूनला राज्यातल्या महायुतीच्या खासदारांच्या घरासमोर काँग्रेस घेराव आंदोलन करणार आहे.
रेल्वे भाडेवाढ मागे घेईपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.