शिवसेनेबरोबर युती तोडा, भाजपमध्ये मागणी

मुंबई : भाजपमध्ये स्वबळावर निवडणूक लढण्याची मागणी पुढे आली आहे. मुंबईत सुरू असलेल्या कार्यकारिणी बैठकीत याबाबत जोरदार सूर उमटलाय. भाजपचे नेते मधू चव्हाण यांनी थेट भाषणातच हा मुद्दा छेडलाय... दरवेळी आपण तडजोड का करायची.. ९५ साली ती काळाची गरज होती. तीन पायांच्या शर्यतीचा आता कंटाळा आलाय, असं ते म्हणतायत...

भाजपचे राज्यात १४५पेक्षा जास्त आमदार स्वबळावर निवडून आणा, अशी सादच त्यांनी कार्यकर्त्यांना घातलीये... भाजपचं बोन्साय करायचं आहे का, असा सवालही त्यांनी केलाय... अन्य अनेक नेत्यांनीही अशाच पद्धतीची भाषा केल्यानं या बैठकीतला सूर महायुती तोडण्याचाच असल्याचं स्पष्ट झालंय..

'महायुती म्हणूनच लढणार' फडणवीस यांचा खुलासा

दरम्यान, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी मात्र महायुती म्हणूनच विधानसभा निवडणुकांना सामोरं जाऊ, असं म्हटलंय... एका दिवसात अशी युती तोडता येत नाही... विचारांवर आधारीत ही युती आहे, असं स्पष्ट केलंय... बघुयात फडणवीस काय म्हणालेत...

  • आपल्या पक्षाची युती गेल्या 25 वर्षांपासून आहे, विचारांवर आधारीत आहे
  • आपल्या भावना प्रामाणिक असल्या तरी आपले मित्रपक्ष...
  • चांगल्या-वाईट दिवसांत सोबती राहिले आहेत...
  • तेव्हा एका दिवसात अशी युती संपवता येणार नाही...
  • तुमची भावना महायुतीच्या बैठकीत मांडू... भावनांची दखल घेतली जाईल...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
break the coaletion from Shiv Sena, BJP leaders demand in executive committee meet
News Source: 
Home Title: 

शिवसेनेबरोबर युती तोडा, भाजपमध्ये मागणी

शिवसेनेबरोबर युती तोडा, भाजपमध्ये मागणी
Yes
No